पाच एकर जमीन विकून वडिलाने घडविला कुस्तीपटू, मुलानं अशी केली परतफेड

| Updated on: Jan 12, 2023 | 8:48 PM

लहानपणीपासून त्यांनी मला तालमीत टाकलं होतं. पैशाची अडचण असल्यानं त्यांनी जमीन विकली. महाराष्ट्र केसरीचं सुवर्ण पदक मिळालं.

पाच एकर जमीन विकून वडिलाने घडविला कुस्तीपटू, मुलानं अशी केली परतफेड
सुनील तोडकर त्यांच्या पदक विजेत्या मुलासह.
Follow us on

संजय दुधाणे, प्रतिनिधी, पुणे : महाराष्ट्र केसरीतील कुस्ती रिंगणासाठी ९ एकरपैकी पाच एकर जमीन सुनील तोडकर (Sunil Todkar  ) यांनी विकली. त्यांच्या मुलांच सुवर्णपदकाचं स्वप्न साकार झालं. पाच एकर जमीन विकून मल्ल घडविण्याचं स्वप्न साकार झालं. महाराष्ट्र केसरीतील (Maharashtra Kesari) मेडल आलं आहे. स्पर्धकाचे वडील म्हणाले, मी एका शेतकरी कुटुंबातील माणूस आहे. गरीब असल्यानं मुलाला घडविण्यासाठी पाच एकर जमीन विकली. मुलगा आळंदी येथील दिनेश गुंड यांच्या तालमीत होता. त्यानंतर त्याला दिल्ली येथे वीरेंद्र स्पोर्ट्स अकादमी येथे पाठविलं. त्याठिकाणी त्यानं कष्ट घेतले. आता तो त्यात यशस्वी झाल्याचं सुनील तोडकर यांनी सांगितलं.

 

खुरागीसाठी पैसे केले खर्च

दिल्लीत कुस्तीपटूसाठी खुराग खूप लागते. त्यासाठीच पैसे खर्च करावे लागले. पाच एकर जमीन विकली. मुलाला खुराग चांगली दिली. त्याच्या कष्टाचं चिज झालं. त्याचा आनंद होत असल्याचंही सुनील तोडकर यांनी म्हंटलंय.

वडिलांनी जमीन विकून मल्ल घडविलं. याबाबत बोलताना सुवर्ण पदक विजेता म्हणाला, लहानपणीपासून त्यांनी मला तालमीत टाकलं होतं. पैशाची अडचण असल्यानं त्यांनी जमीन विकली. महाराष्ट्र केसरीचं सुवर्ण पदक मिळालं.

 

आंतरराष्ट्रीय मेडल घेण्याचं स्वप्न

 

विजेत्याला जावा गाडी मिळते. मुरलीधर मोहोळ यांनी प्रथमचं हे सुरू केलं. ही पहेलवानांसाठी आनंदाची गोष्ट आहे. राज्य स्पर्ध जिंकली. आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मेडल घेणं हे स्वप्न आहे. ऑलिम्पिकपर्यंत जाण्याची इच्छा आहे.

ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवून द्यावं. एवढचं आपलं स्वप्न असल्यांच सुनील तोडकर यांनी सांगितलं.  मुलानं वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं. त्यामुळं पाच एकर जमीन गेली. पण, त्यातून कुस्तीपटू घडला.

त्यानं महाराष्ट्र केसरी जिंकली. आता ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करावी, अशी इच्छा सुनील तोडकर यांनी व्यक्त केली. मुलांन पुण्यात झालेली महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सुवर्णपदाक जिंकलं. त्यामुळं त्यांच्या आशा आता दुनावल्या आहेत.