इंदापूर – कोरोनानंतर यंदा प्रथमच आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा पार पडत आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज (Jagadguru Sant Shrestha Tukaram Maharaj) पालखी सोहळ्यातील अश्वाचे पहिले गोल रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे पार पडले. दोन वर्षानंतर प्रथमच झालेल्या या रिंगण सोहळ्या त वारकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले अश्वरिंगण पार पडले. पालखीला अगोदर प्रथम झेंडेकरी नंतर तुळशी वृंदावन घेत महिला वारकरी, त्यानंतर विणेकरी यानंतर मानाच्या पालखी बरोबर असणाऱ्या अश्वाने रिंगणाच्या तीन फेऱ्या केल्या, कोरोनामुळे (corona)दोन वर्ष पालखी सोहळा बंद होता मात्र यावर्षी रिंगण सोहळा सुरू झाल्याने रिंगणात उत्साह दिसून आला. पूर्ण देहभान हरपून विठुनामाचा जप करीत, तुकाराम. महाराजांचा जयघोष करीत वारक-यांनी पहिले गोल रिंगण केले. हा नेत्रदीपक रिंगण सोहळा(Ringan sohal) पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लाखो भाविकानी गर्दी केली होती. बेलवाडीमध्ये तुकारामाच्या पालखीचं चौथा मुक्काम आहे.
लाखो वैष्णवांचा मेळा जमला
पालखी सोहळ्यातील बेलवाडी गावामधील हे पहिलेच रिंगण आहे. कोरोनाच्या महामारीनंतर पहिल्यांदाच रिंगण सोहळा संपन्न झाल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह वातावरण होते. रिंगण सोहळा पाहण्यासाठी लाखो वैष्णव गर्दी केली यापूर्वीही संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात काटेवाडी येथेही वैशिष्ट्यपूर्ण असे मेंढ्याचे रिंगण पार पडले. पालखी सोहळ्यातील मेंढ्याच्यारिंगणातील ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून जपली जात आहे.विठू नामाचा जय घोष करत दरवर्षी पालखी सोहळ्यात हे रिंगण घातले जाते. मात्र कोरोनामुळे दोन वर्षे यामध्ये खंड पडला होता. मेंढपाळांकडून मेंढ्याना रोगराईपासून दूर ठेवत असे म्हणत साकडे घालण्यासाठी सुरु केली परंपरा आजही तितक्या उत्साहात सुरु आहे.