Khadakwasla Dam : खडकवासला धरण 100 टक्के भरले, धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग वाढवला

| Updated on: Jul 12, 2022 | 1:37 PM

खडकवासला धरण 100 टक्के भरले, मागच्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाल्याने खडकवासला धरण भरले आहे.

Khadakwasla Dam : खडकवासला धरण 100 टक्के भरले, धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग वाढवला
Follow us on

पुणे – खडकवासला धरण (Khadakwasla Dam) 100 टक्के भरले असल्याने धरणाच्या सांडव्यातून सुरू विसर्ग वाढवून दुपारी 1 वाजता 11 हजार 900 क्युसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या (River) नागरिकांनी दक्षता घ्यावी-जिल्हा प्रशासनाचे (District Administration) आवाहन केले आहे. राज्यात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राज्यातील अनेक धरणांमध्ये पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस असल्यामुळे खडकवासला धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. आज तर चक्क धरण भरल्याने पुणेकरांसाठी आनंदाचा क्षण आहे. कारण खडकवासला धरणातून पुणेकरांना पाणी पुरवलं जातं.

पवना धरणात पाणीसाठ्यात कमालीची वाढ

पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ तालुक्याला वरदान ठरलेल्या पवना धरणात पाणीसाठ्यात कमालीची वाढ आहे. 24 तासात धरण परिक्षेत्रात पडलेला पाऊस 136 मि.मि. आहे. 1 जूनपासून झालेला पाऊस 903 मि.मि. आहे. मागील वर्षीचा आजच्या तारखेचा पाऊस 574 मि.मि. होता. पवना धरणातील सध्याचा पाणीसाठा 36.49% टक्के आहे. मागील वर्षी आजच्या तारखेचा पाणीसाठा 33.43% टक्के होता. 24 तासात धरण पाणीसाठ्यात झालेली वाढ 5.40% टक्के आहे. 01 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ 19.65% टक्के आहे.

खडकवासला धरणसाखळी संततधार पाऊस सुरू

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी संततधार पाऊस सुरू आहे. धरणातील पाणीसाठा ३० टक्क्यांवर पोहोचला आहे. चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावली होती.
रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ७५ मिलिमीटर झाला होता. तर वरसगाव धरण परिसरात ७४ मि.मी, पानशेत धरण परिसरात ८५ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात १८ मि.मी पावसाची नोंद आहे.

हे सुद्धा वाचा

भंडारदरा धरण पन्नास टक्के भरले आहे

अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असलेले भंडारदरा धरण पन्नास टक्के भरले आहे. अकरा टिएमसी क्षमता असलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच सहा दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे . मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक धरणात सुरू आहे. उत्तर नगर जिल्ह्यातील नागरिकांच्या पिण्याचे पाणी आणि शेती या धरणावर अवलंबून आहे. पंधरा ऑगस्ट पर्यंत भंडारदरा धरण भरत असते मात्र पावसाचा जोर असाच कायम राहीला तर लवकरच हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने वाकी जलाशय पुर्ण क्षमतेने भरल्याने ओव्हरफ्लो झाला आहे.