Pune IMD : पुणेकरांना काहीसा दिलासा? पुढचे काही दिवस ढगाळ वातावरण राहणार, हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

| Updated on: May 09, 2022 | 12:47 PM

मराठवाडा आणि विदर्भात रविवारी दिवसाचे तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले. मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात 9 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती राहण्याची शक्यता आहे. तर विदर्भात 12 मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

Pune IMD : पुणेकरांना काहीसा दिलासा? पुढचे काही दिवस ढगाळ वातावरण राहणार, हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
ढगाळ वातावरण (प्रातिनिधिक छायाचित्र)
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : येत्या काही दिवसांत पुण्यात ढगाळ वातावरण (Cloudy) राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथे दिवसाचे तापमान 40.7 अंश सेल्सिअस, पाषाण येथे 40.8 अंश सेल्सिअस आणि लोहगाव येथे दिवसाचे तापमान 40.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. लव्हाळे यांनी रविवारी दिवसाचे तापमान 41.8 अंश सेल्सिअस तर मगरपट्टा येथे 41.4 अंश सेल्सिअस नोंदवले. पुणे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रविवारी उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेसारख्या परिस्थितीबाबत आपला अंदाज व्यक्त केला आहे. रविवारी, संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपुरी येथे 44.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. रविवारी पुण्यात सर्वात कमी 21.4 अंश सेल्सिअस तापमान (Temperature) नोंदवले गेले. ढगाळ वातावरण शहरात पाहायला मिळाले. आगामी काही दिवसही काहीशा अशाच स्वरुपात वातावरण राहणार आहे.

‘असानी’ चक्रीवादळ

मराठवाडा आणि विदर्भात रविवारी दिवसाचे तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले. मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात 9 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती राहण्याची शक्यता आहे. तर विदर्भात 12 मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे, असे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, आग्नेय बंगालच्या उपसागरावर आणि लगतच्या अंदमान समुद्रावरील दाबाचा पट्टा शनिवारी संध्याकाळी एका खोल दाबामध्ये केंद्रित होऊन रविवारी दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरावर ‘असानी’ चक्रीवादळ तयार झाले.

आणखी तीव्र होणार चक्रीवादळ

चक्रीवादळ वायव्येकडे सरकण्याची आणि 9 मे सकाळपर्यंत पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली होती. ते 10 मे संध्याकाळपर्यंत वायव्येकडे सरकत राहण्याची दाट शक्यता आहे आणि उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीपासून पश्चिम मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर ओडिशाच्या किनारपट्टीपासून उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागराकडे जाण्याची दाट शक्यता आहे, असेही आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.