…तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता; कायदेतज्ज्ञ असीम सरोदे नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Feb 09, 2023 | 3:38 PM

अपात्र होण्यासंदर्भातली दुसरी कारवाई सुरू होऊ शकते. १६ जण अपात्र झाल्यास भाजपकडे बहुमत राहणार का, हा प्रश्न निर्माण होतो. भाजपकडं बहुमत राहणार नाही. तसं महाविकास आघाडीकडेही बहुमत राहणार नाही.

...तर राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता; कायदेतज्ज्ञ असीम सरोदे नेमकं काय म्हणाले?
असीम सरोदे
Follow us on

पुणे : सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारांच्या अपात्रतेच्या विषयावर सुनावणी सुरू आहे. ही अंतीम सुनावणी आहे. त्यामुळं निकाल येण्याची शक्यता आहे. हे आमदार अपात्र (Disqualification) झाल्यास राज्यात कुणीही सत्ता स्थापन करू शकणार नाही. अशावेळी राष्ट्रपती राजवट (President’s rule) लागू होण्याची शक्यता असल्याचं कायदेतज्ज्ञ असीम सरोदे ( Asim Sarode ) म्हणाले. पुण्यात ते बोलत होते. असीम सरोदे म्हणाले, भारतीय संविधानातील कलम १७२ नुसार, प्रत्येक विधानसभेचा कार्यकाळ हा पाच वर्षे असेल, असं सांगितलं आहे. पाच वर्षांचा कार्यकाळ झाल्यास विधानसभा आपोआप बरखास्त होते. त्याआधी राष्ट्रपती राजवट लागली. किंवा कुणीही सरकार स्थापन करू शकत नसतील तर आपोआप सरकार बरखास्त होते. त्यामुळं १४ वी विधानसभा बरखास्त झाल्यास कोणत्याही पोटनिवडणुका घेतल्या जाण्याची कायदेशीर गरज उरत नाही. १४, १५, १६ फेब्रुवारी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यास कोणत्याही पोटनिवडणुका होणार नाहीत, असं माझं मत असल्याचं कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी म्हंटलं.

निकाल येण्याची शक्यता

सर्वोच्च न्यायालयात राजकीय संघर्षासंदर्भात आणि आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी सुरू आहे. या सत्तासंघर्षाची सुनावणी जवळपास पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानी सांगितल्याप्रमाणे लेखी युक्तिवादही सादर करण्यात आले. त्यामुळं १४ तारखेपासून होणारी सुनावणी ही अंतीम स्वरुपाची आहे. त्यामुळं निकालसुद्धा येण्याची शक्यता आहे.

निकाल पाहिल्यास १६ जण अपात्र ठरण्याची जास्त शक्यता आहे. म्हणून हे सरकार पडेल. सरकार पडल्यास कुणाकडेच बहुमत राहणार नाही. कारण काही जण अपात्र ठरतील. त्यामुळं राष्ट्रपती राजवट लावण्याशिवाय दुसरा पर्याय संविधानिकदृष्ट्या उरत नाही, असंही असीम सरोदे यांनी सांगितलं.

कुणाकडेच बहुमत राहणार नाही

राजकीय बंड करणाऱ्या १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आहे. यासंदर्भातील वाद हा सर्वाच्च न्यायालयात सुरू आहे. हे १६ जण अपात्र झाले तर ते शिंदे गटातील आमदार अपात्र ठरतील. त्यामुळं ज्यांनी हे सत्तांतर घडवून आणलं हेच लोक आमदार राहणार नाहीत. बाकीच्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल.

अपात्र होण्यासंदर्भातली दुसरी कारवाई सुरू होऊ शकते. १६ जण अपात्र झाल्यास भाजपकडे बहुमत राहणार का, हा प्रश्न निर्माण होतो. भाजपकडं बहुमत राहणार नाही. तसं महाविकास आघाडीकडेही बहुमत राहणार नाही. कुणीचं सरकार स्थापन करण्याच्या परिस्थितीत नसतील. अशावेळी राष्ट्रपती राजवट लावली जाईल, असं मत असीम सरोदे यांनी व्यक्त केलं.