नवीन पठाण, Tv9 मराठी, प्रतिनिधी, बारामती : विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे ठिकठिकाणी बैठकी घेत आहेत. ते आज बारामतीत होते. यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र यावं. त्यांना खंजीर चिन्ह दिलं जावं. कारण हे खंजीर खुपसण्यात पटाईत आहेत, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला खंजीर चिन्ह मिळाल्यावर त्यांनी तो खंजीर एकमेकात घुसवू नका. समोरच्यात घुसवा, असा खोचट टोलाही पडळकर यांनी लगावला.
बारामतीत शाखा सुरु झाली हे रावणाच्या लंकेत हनुमानाच्या शेपटीला आग लावण्यासारखं आहे, असं मत गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलं.
बारामतीच्या राजाचा हात लागला तर राख होते हे आम्ही प्रत्येक्षात बघीतलं. शिवसेनेची परिस्थिती तशीच झाली. त्यामुळं राष्ट्रवादीच्या नादाला जे जे लागतील त्यांची राख होतं आहे.
गेल्या 40 वर्षात पवारांनी एसटी कामगारात हनुमान पाहिला. बिनभांडवली सैन्य वापरलं. एसटी कामगारांचा लढा एका दिवसात उभा राहिला नाही. 7-8 महिने कामगाराची माहिती घेतली. त्यानंतर आंदोलनात उतरलो, असं त्यांनी सांगितलं.
कामगारांची संघटना काढून पुढारी होणाऱ्यातला गोपीचंद पडळकर नाही. आर्थिक आणि राजकीय फायद्यासाठी काहीजण संघटनेत येतात. मला भाजपने विधान परिषद दिलीय.
काहींनी वर्गण्या गोळा केल्या. आम्ही पाच पैसे घेतले असते तर शरद पवार आणि त्यांचा पुतण्या शांत बसला असता का? आता एसटी कामगार जागे झालेत. तुम्ही इतके भयमुक्त झालात की सिल्व्हर ओकवर दगड मारलेत.
एसटी कामगार पन्नास गावचं पाणी पिऊन येतात. एसटी कामगारांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेवून पाठपुरावा करतोय. 118 कर्मचारी अनावधानानं चुकले होते. त्याना तुरुंगात टाकलं. त्यांना बडतर्फ केलं.
एकनाथ शिंदे यांनी त्यांना परत घेतले. आमचे कृतीला समर्थन नाही. पण छोट्याशा चुकीला किती महत्व देणार विधान परिषदेत सातत्याने आवाज उठवला.
आम्ही आंदोलनात उतरल्यावर कर्मचाऱ्यांची माथी भडकवल्याचा आरोप केला. पण विलिनीकरण शक्यच नाही. हे समजल्यावर आम्ही आंदोलनातून बाहेर पडलो.आम्ही केवळ एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आग्रही होतो.
एसटी कर्मचाऱ्याना सातवा वेतन आयोग मिळाला पाहिजे. दिवाळी बोनस याबद्दल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटू. आम्ही एखाद्या विषयाला हात घातला की पूर्णच करतो.राज्यातल्या कामगारांच्या संघटनांमध्ये शरद पवारांनी त्यांची मानसे पेरलीत.
युगांडात एक तानाशाह माणसांचे मांस खायचा. तिथल्या लोकांना मारुन अवयव खायचा. बारामतीचा तानाशाह लोकांना मारत नाही. पण त्यांचं रक्त शोषून घेतो, असंही ते म्हणाले.