पुणे- यंदा तीव्र उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. यावेळी मान्सून अंदमानाच्या समुद्रात मोसमी पाऊस (र्नैऋत्य मोसमी वारे) सोमवारीच दाखल झाला आहे. येत्या 2 जूनपर्यंत तळकोकणात येईल असा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवला आहे. सर्वसाधारणपणे यावेळी मोसमी पाऊस (Rain)पाच ते सहा दिवस आधीच अंदमानात दाखल झाला आहे. याचाच र्नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग पाहता ते तळकोकणात 8ते 10 जूनऐवजी 2 ते3 जूनला येण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे. र्नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनामुळे वाऱ्यांचा वेग वाढला असून मध्य भारतातील कमाल आणि किमान तापमान तीन ते चार अंशांनी घटणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या 24 तासात मराठवाड्यासह (Marathwada)विदर्भात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.
हवामान विभागाच्या मते महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत 17 ते 19 मे या कालावधीत विजांचा कडकडाट आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याबरोबरच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.