शिकारीच्या शोधात आला, शिकार मिळाली नाही मग त्याने या वस्तूच चोरल्या

| Updated on: Jun 06, 2023 | 9:08 PM

त्याला काही शिकार मिळाली नाही. मग, त्याने तीन जोड चपला उचलल्या आणि पसार झाला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील ही घटना पाहून सारे चकीत झाले.

शिकारीच्या शोधात आला, शिकार मिळाली नाही मग त्याने या वस्तूच चोरल्या
Follow us on

सुनील थिगळे, प्रतिनिधी, आंबेगाव (पुणे) : ही घटना आहे निरगुडसर येथील. वैभव वळसे यांच्या घरचे लोकं नेहमीप्रमाणे झोपून उठले. त्यांना चप्पल दिसली नाही. त्यामुळे या या तीन चपलाचे जोड कुठी चोरली असतील, याचा त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना धक्कादायक बाब कळली. सीसीटीव्ही तपासले असता एक बिबट्या त्यांच्या घराच्या परिसरात आला. बिबट्या हा शिकारीसाठी गावात आला असावा. पण, त्याला काही शिकार मिळाली नाही. मग, त्याने तीन जोड चपला उचलल्या आणि पसार झाला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील ही घटना पाहून सारे चकीत झाले.

बिबट्याच निघाला चोर

चक्क बिबट्याच निघाला चप्पल चोर… आम्ही तुम्हाला असं म्हटलं तर विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे वैभव वळसे यांच्या घरी शिकारीच्या शोधात मध्यरात्री बिबट्याला आला. मात्र या बिबट्याला या ठिकाणी शिकार मिळाली नाही. मग या बिबट्याने चक्क घरातील तीन व्यक्तींच्या चप्पल वरतीच डल्ला मारत चप्पल पळून नेल्या.या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय.

 

हे सुद्धा वाचा

चप्पल कुठे गायब झाल्यात

वैभव वळसे हे आज सकाळी उठल्यानंतर त्यांना घरासमोर चप्पल दिसल्या नाहीत. मग त्यांनी घरातील व्यक्तींच्या चप्पल कुठे गायब झाल्यात याचा शोध घेतला. चोरट्यांनी रात्री चप्पल चोरून नेल्या नाहीत ना, हे पहाण्यासाठी सीसीटीव्ही चेक केला.

चप्पल चोर बिबट्या

मात्र त्यांना सीसीटीव्ही असं काही पाहायला मिळाले की हे पाहून त्यांना धक्काच बसला. घरातील तीन व्यक्तींच्या चप्पल चक्क बिबट्याने चोरून नेल्याचा हा प्रकारच सीसीटीव्ही कॅमेरा चित्रित झालाय. त्यामुळे चप्पल चोर या बिबट्याची चांगलीच चर्चा रंगलीय.