पुणे – दौंड तालुक्यातील कुरकुंभ मार्गावरील मोरेवस्ती जवळ असेलेल्या साठवण तलावात(pond) बुडून तीन युवकांचा करुण अंत (Youth Death) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत तरुण दौंड नगरपालिकेला (Daund Municipality) पाणी पुरवठा करणाऱ्या शहराजवळील मेरगळवाडी येथील तलावात पोहण्यासाठी गेले होते. असरार अब्दुल अलीम काझी, करिम अब्दुल हादी काझी, अतिक उझजमा फरिद शेख अशी या युवकांची नावे आहेत. याबाबत पोलीसांनी दिलेली माहितीनुसार तिघेजण पोहण्यासाठी दुचाकी वर नगरपालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात गेले होते. बराच वेळ झाल्याने हे घरी आले नाही. यामुळे घराच्यांनी मोबाईल वरती फोन लावला असता फोन बंद होता. त्यानंतर शोधाशोध सुरु केली असता पाण्याच्या तलावाजवळ त्यांची दुचाकी आढळून आली. त्यानंतर शोध घेतला असता तलावात त्यांचे मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. युवकांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेच्या दरम्यान असरार अब्दुल अलीम काझी, करिम अब्दुल हादी काझी, अतिक उझजमा फरिद शेख तिघेही पोहण्यासाठी म्हणून तलावावर गेले होते. मात्र बराचवेळ झाला तरी तिघेही न परतल्याने घराच्यांनी मोबाईल वरती फोन लावला मात्र रिंग वाजत होती . पण उचलला जात नव्हता. त्यानंतर कुटुंबीयांनी मित्रांना फोन लावला मात्र तरी फो उचलला जात नव्हता. यामुळे अब्दुल अलीम काझी, असिम इस्माईल शेख ,रफिक इकबाल सय्यद ,कलिम सलीम सय्यद या सर्वजणांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
शोध घेत असताना दौंड शहरात मेगळवाडी, लिंगाळी येथील पिण्याचे पाणी पुरवठा करणारे दौंड नगरपालिकेच्या तळ्याजवळ जाऊन पाहिले असता तेथे गाडी मिळून आली. त्यामुळेशोध घेणाऱ्या लोकांचा संशय बळावला. त्यांनी तलावात पोहत असताना पाण्यात बुडले असावे असा संशय आल्याने दौंड पोलिस स्टेशनला याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटना स्थळावर धाव घेतली स्थानिक नागरिकांच्या मदतीनं पोलीसांनी तलावातील पाण्यात जावून शोध घेतला. त्यावेळी त्या तिघांचेही मृतदेह पाण्यात आढळून आले. मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून तिघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल केलं, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
वैराग्य दाखवून बगल में छुरी घेऊन फिरायचं, भाजप नेते गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर सणसणीत टीका!
Health Care Tips : जेवण केल्यानंतर तुम्हीही करता ‘या’ चुका? तर वेळीच सावध व्हा, नाहीतर…