सोलापूर: जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावातील विद्यार्थ्यांची शाळा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्य अधिकारी यांच्या दालनासमोर विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांनी भरवली आहे. सरकारच्या सूचनेनुसार यंदा शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, या गावातील शाळा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. त्यामुळे आमच्या पाल्यांना आम्ही शाळेत पाठवायचा कसा असा सवाल करत गावकऱ्यांनी सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या आवारातच शाळा भरवली आहे. (Tirhe villagers starting school with students at Solapur CEO office)
उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावात असलेल्या जिल्हा परिषदेची शाळा सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. आजूबाजूला अवैध धंद्यांचं आगार बनलं आहे, त्यामुळे पाल्यांना शाळेत पाठवायचं कसा असा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्यानंतर सुद्धा दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी विद्यार्थ्यांची शाळा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात भरवलेली आहे.
तिऱ्हे जिल्हा परिषद शाळेसाठी वर्ग खोल्या शिल्लक आहेत. काही ग्रामस्थांनी अतिक्रमण केलं आहे. शासनाच्या नियमानुसार 27 जानेवारीपासून शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. गुटखा, दारू विक्रीसारखे प्रकार घडत असल्यानं मुलं घाबरलेली आहेत. आठ दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिलं आहे. पण, कारवाई न झाल्यानं जिल्हा परिषेदत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर शाळा भरवली असल्याचं पालकांनी सांगितले.
अधिकाऱ्यांची भंबेरी
अचानक विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात शाळा भरविल्या मुळे याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मात्र भंबेरी उडाली आहे. शाळेचा अतिक्रमणाची गंभीर दखल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्य अधिकारी दिलीप स्वामी यांनी घेत यासंदर्भात समिती गठीत करून अतिक्रमण काढून टाकण्यात येणार असल्याचे सांगितलयं.शिवाय याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांना अतिक्रमणाबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्याबद्दल कार्यवाही का केली नाही, याबद्दल चौकशी करण्यात येणार आहे. अतिक्रमणामुळे शाळा बाधित होत असतील तर ते चालणार नाही, कारवाई केली जाईल, दिलीप स्वामी यांनी सांगितलं.
एमएसपी आहे तर कायदा बनवा; राकेश टिकैत यांचं पंतप्रधानांना आव्हानhttps://t.co/UH16i70dbd#RakeshTikait | #NarendraModi | #Parliament | #farmersrprotest | #BJP
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 8, 2021
संबंधित बातम्या:
नागपूर ग्रामीण भागातील शाळा 14 डिसेंबरपासून सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाचे एकमत.
(Tirhe villagers starting school with students at Solapur CEO office)