मुंबई : राज्य सरकारने आज (3 ऑगस्ट) ब्रेक द चेन अंतर्गत नवे नियम जारी केले. या नव्या नियमांनुसार सरकारने पुण्याचा समावेश लेव्हल तीनमध्ये केला असून येथे तिसऱ्या लेव्हलचे सर्व नियम लागू असतील. या नियमानुसार येथे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. याच कारणामुळे येथील व्यापारी आक्रमक झाले आहेत. सरकारने निर्णय बदलावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु असा इशारा येथील व्यापाऱ्यांनी दिला आहे. याच मागणीला घेऊन व्यापाऱ्यांतर्फे पुण्यात 3 ऑगस्ट रोजी पुण्यात घंटानाद आंदोलन केले जाणार आहे. (traders demand to change Corona rules in Pune will protest on 3 August)
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झाली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अजूनही कोरोना आटोक्यात आलेला नाही. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने आज नवे कोरोना प्रतिबंधक नियम लागू केले आहेत. या नियमावलीमध्ये पुण्याचा समावेश तिसऱ्या लेव्हलमध्ये करण्यात आलाय. तिसऱ्या लेव्हलमधील नियमांनुसार येथे अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने दुपारी चार वाजेपर्यंतच सुरु ठेवता येतील.
मागील काही दिवसांपासून पुण्यातील व्यापारी निर्बंध शिथील करण्याची मागणी करत आहेत. तसेच दुकाने सुरु ठेवण्याची वेळ वाढवून देण्यात यावी असेही काही व्यापारी संघटना म्हणत आहेत. मात्र, राज्य सरकारने व्यापाऱ्यांच्या या मागण्यांना धुडकावून लावत दुकाने सुरु ठेवण्याच्या वेळेत वाढ केलेली नाही. याच करणामुळे सध्या पुण्यातील व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे.
पुण्यातील व्यापाऱ्यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राज्य सरकारने नियमांत बदल केला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. उद्या ( 3 ऑगस्ट) सरकारविरोधात सर्व व्यापारी घंटानाद आंदोलन करणार आहेत. तसेच आमच्यावर खटले भरले तरी चालतील पण बुधवारपासून आम्ही दुकानं खुली करणार आहोत. असा गर्भित इशारा व्यापाऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे.
इतर बातम्या :
राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत काही प्रमाणात सूट, ठाणे, मुंबई आणि उपनगराचा निर्णय नेमका काय?
मराठा विद्यार्थ्यांसाठी 14 ठिकाणी वसतीगृहे तयार; पालकमंत्र्यांच्या हस्ते लवकरच उद्घाटन होणार
(traders demand to change Corona rules in Pune will protest on 3 August)