पुणे : गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून बारामती लोकसभा मतदार केंद्रावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन, देवेंद्र फडणवीस आणि सातत्याने चंद्रशेखर बावनकुळे बारामतीचा दौरा करत आहेत. त्यामुळे भाजपकडून वारंवार बारामती लोकसभेच्या मतदार केंद्रावर लक्ष ठेवण्यात आले असून आता पुन्हा एकदा तृप्ती देसाई यांच्यामुळे हा मतदार संघ चर्चेत आला आहे.
बारामती मतदारसंघात भाजपा आणि एकनाथ शिंदेंनी विचार केल्यास मी निवडणूक लढवणार असल्याचे मत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले. बारामती लोकसभा लढवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी बारामती मतदार संघातून आपण इच्छूक असल्याचे सांगत त्यांनी घराणेशाहीच्या विषयावरून पवार कुटुंबीयांवर टीका केली आहे.
बारामती मतदारसंघात घराणेशाहीचं राजकारण असल्याचा घणाघातही त्यांनी केला आहे.त्यामुळे आता बारामती मतदार संघ तृप्ती देसाई यांनी इच्छा व्यक्त केल्याने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
तृप्ती देसाई यांनी बारामती मतदार संघातून आपण इच्छूक असल्याचे सांगत आपल्याला आम आदमी पक्षाकडूनही ऑफर असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, सुप्रिया सुळे पुन्हा या मतदारसंघात फिरत आहेत.
त्यामुळे आगामी लोकसभेसाठीही त्याच उमेदवार असतील असंही त्यांनी यावेळी सांगितले. मात्र राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे चांगले काम असल्याने आता भाजपलाही लोकांची पसंदी असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आपण बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असून आम आदमी पक्षाकडूनही मला ऑफर आली आहे असंही तृप्ती देसाई यांनी सांगितले आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षानं जर मला संधी दिल्यास मी ती ऑफर नाकारणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.
तृप्ती देसाई यांनी बारामती लोकसभेसाठी इच्छा व्यक्त केल्याने आता त्यांचा भाजप पक्ष प्रवेशाचे संकेत असल्याचेही बोलले जात आहे. यावेळी त्यांनी बारामती मतदार संघात विकास झाला नसून, बारामतीच्या विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.