पुणे – राज्यात बारावीचे परीक्षा सध्या सुरू आहेत. परीक्षे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी बोर्डाकडून अनेक प्रयत्न केले जात असतानाच आज मुंबईमध्ये (Mumbai) केमिस्ट्रीचा (Chemistry)पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. मात्र मुंबईत केमिस्ट्री विषयाचा झालेला प्रकार पेपर फुटीचा नाही तर कॉपीचा प्रकार म्हणता येईल. एक विद्यार्थी उशीरा केंद्रावर आली. केंद्र संचालकांनी पोलीसांत माहिती दिल्यावर हा प्रकार पुढे आला. पेपरफुटीचा हा प्रकार नाही तर कॉपीचा प्रकार आहे. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारात सहभागी होऊ नये नाहीतर दोन वर्ष कारावासाची शिक्षा होऊ शकते. अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. याबरोबरच पोलीस तपासात सगळी माहिती बाहेर येईल जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई नगर जिल्ह्यातील पेपर फुटीची माहिती गोळा करण्याचं काम सुरु असून याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांनी (Education Minister Varsha Gaikwad) माहिती घेतली आहे. असेही ते म्हणाले आहेत.
उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू होतीये 16 लाख 39 हजार विद्यार्थी परीक्षेला बसतायेत. गैरप्रकार न करता विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जावं. परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन , कॉपीचे प्रकार करू नये असेही त्यांनी म्हटले आहे. असा कोणताही गैर प्रकार आढळल्यास त्या विद्यार्थ्यांची गय केली जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुंबईमध्ये केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. शनिवारी बारावीच्या विद्यार्थ्यांचा केमिस्ट्री पेपर होता. राज्यामध्ये इतर ठिकाणी हा पेपर सुरळीत पार पडला. परंतू मुंबईमधील विलेपार्ले परिसरातील साठे कॉलेजमध्ये पेपर फुटीची घटना उघडकीस आली आहे. मात्र, शिक्षण मंत्र्यांनी पेपर फुटल्याचा आरोप खोडून काढला आहे. धक्कादायक बाब म्हणजे केमिस्ट्रीचा जो पेपर लिक झाला आहे, तो चक्क एका व्हाट्सअप ग्रुपवर. या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जवळपास 17 विद्यार्थी असल्याचे बोलले जात आहे. यामुळे हे रॅकेट मोठे असल्याचे देखील बोलले जात आहे.
नेमकं कुठे बिनसलं? आमिरने सांगितलं रिना, किरण रावसोबतच्या घटस्फोटांमागील कारण
Photo Gallery | चित्रकार डॉ. शेफाली भुजबळांच्या कुंचल्यातून साकारलेले निसर्गायण!