उदय सामंतांची गाडी फोडली, कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची पक्रिया सुरु, शिवसैनिकांवर कारवाई होणार?

| Updated on: Aug 02, 2022 | 10:33 PM

उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या तरुणांच्या हातात बेसबॉल स्टिक, हातात बांधलेले दगड कसे आहे, आणि माझ्या गाडीचा नंबर या तरुणांना दिला कोणी असा सवाल आमदार उदय सामंत यांनी केला आहे. यावेळी उदय सामंत यांनी हल्ले करणाऱ्यांमध्ये जर विद्यार्थी असतील तर त्यांची नावं वगळावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे.

उदय सामंतांची गाडी फोडली, कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची पक्रिया सुरु, शिवसैनिकांवर कारवाई होणार?
Follow us on

पुणेः शिवसेनेतून बंडखोरी (Shivsena Rebel MLA) केलेल्या 40 आमदारांवर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर जोरदार टीका करण्यात येत होती, तर आज मात्र कट्टर शिवसैनिकांचा उद्रेक होत, उदय सामंतांच्या (MLA Uday Samant) गाडीवर आज हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात उदय सामंतांच्या गाडीची काच फुटली (Car glass broke) असून याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे हल्ला करणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई होणार का याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी उदय सामंत यांनी हल्ला करणाऱ्यांवर पोलिसांनी पोहचावी आणि योग्य ती कारवाई करावी अशी माणगीही त्यांनी यावेळी केली आहे.

ठाकरे घराण्यावर टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या आज पुण्यात सभा होत्या. त्यामुळे कालपासूनच पुणे आणि परिसरात राजकीय वातावरण तापले होते. त्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेप्रसंगी शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी टीका केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

सावंतांच्या घरी जाताना हल्ला

उदय सामंतही आज पुणे दौऱ्यावर असतानाच आणि पुण्यातील तानाजी सावंत यांच्या घरी जात असतानाच उदय सामंत यांच्या गाडीवर आज शिवसैनिकांनी हल्ला केला. या प्रकरणानंतर कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येत असून हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उदय सामंतांनी पोलिसांकडे केली आहे.

सभेला जात असताना हातात दगड कशाला

उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या तरुणांच्या हातात बेसबॉल स्टिक, हातात बांधलेले दगड कसे आहे, आणि माझ्या गाडीचा नंबर या तरुणांना दिला कोणी असा सवाल आमदार उदय सामंत यांनी केला आहे. यावेळी उदय सामंत यांनी हल्ले करणाऱ्यांमध्ये जर विद्यार्थी असतील तर त्यांची नावं वगळावीत अशी मागणीही त्यांनी केली आहे. मात्र या हल्ल्यामागे राजकीय व्यक्ती असतील तर त्यांच्यापर्यंत पोलिसांनी पोहचावे असंही त्यांनी यावेळी सांगितले.