शरद पवारांच्याच सत्तेत मराठा आरक्षण गायब का होते?; अमित शाह यांचा सवाल

| Updated on: Jul 21, 2024 | 7:48 PM

पुण्यात भाजपचे अधिवेशन पार पडले यावेळी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यामध्ये आले होते. अमित शाह यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मराठा आरक्षणावरून थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

शरद पवारांच्याच सत्तेत मराठा आरक्षण गायब का होते?; अमित शाह यांचा सवाल
शरद पवार, अमित शाह
Image Credit source: Facebook
Follow us on

आगामी विधानसभा निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर  राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. पुण्यात भाजपचे अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला गृहमंत्री अमित शाह आले होते, लोकसभा निवडणुकीमध्ये केलेल्या कामाचं कौतुक करत सर्वांचे आभार त्यांनी आपल्या भाषणामध्ये मांडले. त्यासोबतच काँग्रेस नेते राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शाहांनी पवारांना टार्गेट केलं. शरद पवार सत्तेत असले की मराठा आरक्षण का गायब होते? असा सवाल शाह यांनी केली आहे.

जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचे सरकार येते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण भेटतं. पण शरद पवार यांचं सरकार येतं तेव्हा मराठा आरक्षण जाते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण भेटलं होतं, मात्र शरद पवार सत्तेत आल्यावर ते आरक्षण गायब झालं.  त्यामुळे सत्तेत आल्यावरच मराठा आरक्षण का गायब होते? असा सवाल करत  भ्रष्टाचारांचा सर्वात मोठा सरगणा म्हणजे शरद पवार असल्याचं अमित शाह म्हणाले. त्यासोबतच उद्धव ठाकरे यांना औरंगबजे फॅनक्लबचे नेता असल्याचं म्हटलं आहे.

औरंगबजे फॅनक्लबचे उद्धव ठाकरे नेत आहेत. ते बाळासाहेबांचा वारसदार आहेत असे सांगतात पण ते कसाबला बिर्याणी देण्याची मागणी, छत्रपती संभाजीनगर नामांतराला विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर जाऊन बसलेत. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशा विखारी शब्दात शाहांनी ठाकरेंवरही निशाणा साधला.

गेल्या 10 वर्षात आम्ही गरिबांचं कल्याण करण्याचं काम केलं आहे. काँग्रेस कधीही गरिबांचं कल्याण करू शकत नाही. बाबासाहेब आंबडेकरांचा अपमान इंग्रजांनी जेवढा नाही केला तेवढा अपमान काँग्रेसने केला. काँग्रेस देशात चुकीचा प्रचार करत आहेत. समाजीतील प्रत्येक वर्गासाठी आम्ही काम केलं असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे.  पवारांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निशणा साधला आहे.

भ्रष्टाचाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले अमित शहा जी तुम्ही आज पुण्यात येऊन आदरणीय पवार साहेबांवर टीका केली. मला तुम्हाला एवढंच सांगायचंय, तुम्ही आज ज्या बालेवाडी क्रीडा नगरीत हे भाषण केलं ती क्रीडा नगरी पवार साहेबांनी उभी केली. तिथून हाकेच्या अंतरावर असणारी हिंजवडी आयटी नगरी पवार साहेबांनी उभी केली. पुण्यात असणारी सर्वात मोठी रांजणगाव आणि चाकण एमआयडीसी सुद्धा पवार साहेबांनी उभी केल्याचं अनिल देशमुख म्हणाले.