“अधिकची कामं करुन विधानसभा निवडणुका आम्हीच जिंकू”; देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वाक्यात भाजपचा विश्वास दाखवून दिला

| Updated on: May 15, 2023 | 11:04 PM

16 आमदारांच्या प्रकरणाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, 16 आमदारांचे प्रकरण अध्यक्षांकडे आहे, जो काही निर्णय द्यायचा तो कायदेशीर देतील मात्र एक अभ्यासक म्हणून मला असं वाटतं आहे की, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला पुरतं माहिती झालं आहे की, त्यांचा पोपट मेला आहे.

अधिकची कामं करुन विधानसभा निवडणुका आम्हीच जिंकू; देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वाक्यात भाजपचा विश्वास दाखवून दिला
Follow us on

पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची कोणतीही शक्यता नाही. लोकसभेच्या निवडणुका लोकसभेच्या वेळी होणार आहे. विधानसभेच्या निवडणुका विधानसभेच्यावेळी होणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.तसेच लोकसभेच्या निवडणुका नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड ताकदीने जिंकू व त्यानंतर अधिकची कामं करून विधनासभा निवडणुकाही आम्हीच जिंकू असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बोलताना व्यक्त केला.

भाजपकडून सध्या बारामती मतदार संघावर लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या दौऱ्यावर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन दौऱ्यावर आल्या होत्या.

त्याविषयी त्यांना तुमचं बारामतीवर अधिक लक्ष दिसतंय का असं विचारताच त्यावर त्यांन म्हटले की, त्यामुळे तिथले दौरे तुम्हाला दिसतात, 48 लोकसभा मतदारसंघात आमचे केंद्रीय नेते येत आहेत, तयारी बघत आहेत. त्यामुळे बारामती त्यापेक्षा वेगळी नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

पुणे जिल्हा विभाजनाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, जिल्हा विभाजनाच्या अनेक मागण्या आमच्याकडे आहेत, त्यामुळे एका जिल्ह्याच्या विभाजनाचा विचार करता येणार नाही, सगळ्याचा विचार आम्ही योग्य वेळी करू असंही त्यांनी जिल्हा विभाजनावर स्पष्ट मत मांडले.

तर व्रजमूठ सभेविषयी बोलताना सांगितले की, वज्रमुठीला आधीच तडे गेले आहेत, कुणी कुठे बसायचं, कुठे उभा रहायचं, कुणी पहिले बोलायचं यावर वाद सुरू आहेत.

वज्रमुठीच्या नेत्यांबाबत आधीच शरद पवार यांनी आपल्या पुस्तकात लिहलं आहे, त्यामुळे शरद पवार यांनी बोलल्यानंतर आम्ही बोलण्याची गरज काय असा प्रतिसवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

तर 16 आमदारांच्या प्रकरणाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, 16 आमदारांचे प्रकरण अध्यक्षांकडे आहे, जो काही निर्णय द्यायचा तो कायदेशीर देतील मात्र एक अभ्यासक म्हणून मला असं वाटतं आहे की, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला पुरतं माहिती झालं आहे की, त्यांचा पोपट मेला आहे.

तरी पोपट मान हलवत नाहीय, बोलत नाहीय असं त्यांना बोलावं लागतंय त्यांच्या लोकांना संदेश देण्यासाठी हे त्यांना करावं लागतं असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.