Vaishnavi Patil : लाल महालातील लावणी ते माफीनामा, वादात अडकलेली वैष्णवी पाटील कोण?

| Updated on: May 21, 2022 | 11:19 PM

याप्रकारानंतर मराठा संघटनांनी लाल महालाचं शुद्धीकरण केलंय...तर शिवसेनेनं आंदोलन पुकारलंय. ऐतिहासिक वास्तूत अश्लील प्रकारातली नृत्य सादर केल्याचा आरोप होतोय. त्यात चित्रिकरणासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचंही समोर आलंय. लालमहालाबाहेरच्या सुरक्षाकाला मनवून हे चित्रीकरण करण्यात आलं होतं.

Vaishnavi Patil : लाल महालातील लावणी ते माफीनामा, वादात अडकलेली वैष्णवी पाटील कोण?
Vaishnavi Patil
Image Credit source: Instagram
Follow us on

पुणे : आधीच अनेक मुद्दयांवरुन पुण्याचं सामाजिक वातावरण तापलंय., त्यात आता या लावणीची (Lavni Dance) भर पडलीय. नृत्यांगणा वैष्णवी पाटीलनं (Vaishnavi Patil) थेट ऐतिहासिक लालमहालात (Lal Mahal) या लावणीचं चित्रिकरण केल्यामुळे वाद उभा राहिलाय. या लावणीचा व्हिडीओ स्वतः वैष्णवी पाटीलनं सोशल माध्यमात शेअर केला. त्यानंतर शिवप्रेमींकडूनं संताप व्यक्त होऊ लागला. लावणी कलाकार वैष्णवी पाटील, चित्रीकरण करणारा कुलदीप बापट आणि त्यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल झालाय. दरम्यान, घडलेल्या प्रकाराबद्दल वैष्णवी पाटीलनं माफीही मागितलीय. याप्रकारानंतर मराठा संघटनांनी लाल महालाचं शुद्धीकरण केलंय…तर शिवसेनेनं आंदोलन पुकारलंय. ऐतिहासिक वास्तूत अश्लील प्रकारातली नृत्य सादर केल्याचा आरोप होतोय. त्यात चित्रिकरणासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचंही समोर आलंय. लालमहालाबाहेरच्या सुरक्षाकाला मनवून हे चित्रीकरण करण्यात आलं होतं.

हाच डान्स व्हायरल

कोण आहे वैशाली पाटील?

वैष्णवी पाटील एक नृत्यांगणा म्हणून प्रसिद्ध आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून तिला नृत्याची आवड आहे. अनेक प्रसिद्ध डान्स कार्यक्रमांच्या स्पर्धा ती विजेती राहिलीय. देशताल्या मोठ्या डान्स कार्यक्रमात सहभागीही झालीय. डान्स इंडिया डान्स, झलक, ढोलकीच्या तालावर,
बुगी वुगी, इंडियाज गॉट टॅलेंट, नचले वे, अश्या अनेक स्पर्धांमध्ये तिनं भागही घेतलाय वैष्णवी पाटीलचं स्तःताचं यूट्यूब चॅनल देखील आहे.

वैशालीवर कारवाईची मागणी

लाल महाल ही वास्तू पुणे महापालिकेच्या अखत्यारित येते, पुणे महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे, त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या टीकेचा रोख अप्रत्यक्षपणे भाजपकडे आहे. उदयनराजेंसहीत अनेकांनी घडलेल्या प्रकारावर नाराजी वर्तवून कारवाईची मागणी केलीय. लाल महालाबाहेर महापालिकेचे सुरक्षारक्षकांनी का अडवलं नाही, शहराच्या मध्यवर्ती भागात
असलेल्या ऐतिहासिक वास्तूत घडलेल्या या प्रकाराबद्दल दुर्लक्ष का केलं गेलं, असे प्रश्न विचारले जाताय.

कुठे गुन्हा दाखल?

लाल महालात नृत्य करणाऱ्या वैष्णवी पाटलासह तिघांवर फरासखाना पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. चार दिवसापूर्वी वैष्णवी पाटील आणि तिचा साथीदारांनी लाल महालातील मोकळ्या जागेत नृत्य करत शूटिंग करून व्हिडीओ फेसबुक वर व्हायरल केले होते. वैष्णवीच्या नृत्यानंतर समाज माध्यमातून टिका होत होती. संभाजी ब्रिगेड सह पुरोगामी संघटनेने या घटने विषयी आक्रमक होत आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी केला गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता तरी या वादावर पडदा पडण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून हनुमान चालीसा, हिंदूत्व, नवनीत राणा अटक, केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट असे विविध मुद्दे गाजत आहेत.