पुणे : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्तेत असलेले ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी आज पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या अहिंसेच्या विचारांबाबत बंडातात्या यांनी आपले विचार मांडलेत. हुतात्मा राजगुरू (Rajguru) यांच्या स्मृतीस्थळावर दिलेल्या प्रवचनात बंडातात्यांनी महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्वावर टीका केलीय. ‘महात्मा गांधींचा अहिंसावाद आणि हिंदुत्व दोन्ही तशी पक्षपाती आहेत. 1947 च्या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य अहिंसेच्या मार्गानं मिळालेलं नाही. तर 1942 ला जो क्रांतीकारक अशी जी चळवळ उभी राहिली. चले जाओ.. क्विट इंडिया… त्यामध्ये गावोगावी पोलीसांचे कार्यालय, सरकारी कचेऱ्या जाळणं, रेल्वेचे रुळ उखडणं, या ज्या घटना घडत गेल्या त्याचा बोध इंग्रजांनी घेतला की आता हा देश सोडण्याशिवाय पर्याय नाही’, असा दावा बंडातात्या यांनी केलाय. या कार्यक्रमाला बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्ती संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.’
बंडातात्या पुढे म्हणाले की, असं सांगितलं जातं की स्वातंत्र्यासाठी साबरमती के संत तुने कर दिया कमाल, मिली हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल… पण असं म्हणणं म्हणजे झाशीच्या राणीसह 350 क्रांतीकारकांचा अपमान आहे. शहीद भगतसिंग यांच्या मनात महात्मा गांधींची छाप होती. गांधीजींचा अहिंसावाद त्यांच्या मनात ठसवला होता. मात्र, आपल्याला हे स्वातंत्र्य अहिंसक मार्गाने मिळवायचं आहे. पण हा भगतसिंग यांचा भ्रमाचा भोपळा तीन वर्षातच फुटला. कारण, 1922 ला एक हत्याकांड झालं. त्या हत्याकांडामध्ये त्याला समर्थन देण्यासाठी म्हणून महात्मा गांधींनी नकार दिला. त्यावेळी भगतसिंग महात्मा गांधींवर नाराज झाले.
‘भगतसिंगांच्या मनावर हे परिणाम झाला की मग या म्हाताऱ्याच्या या मार्गानं जायचं काही कारण नाही. त्यानंतर ते क्रांतीकारक बनले. हे उपयोगाचं नाही. लोकमान्य टिळकांचं एक वाक्य आहे, त्यांनी सांगितलं होतं की या म्हाताऱ्याच्या पद्धतीनं जस स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर 1 हजार वर्षे लागतील भारताला, असं लोकमान्य टिळक म्हणायचे’, असंही बंडातात्या यांनी म्हटलंय.
इतर बातम्या :