पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh koshyari Statement) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. आता विश्व हिंदू मराठा संघ (Vishwa Hindu Maratha Sangh) आक्रमक झाला आहे. विश्व हिंदू मराठा संघाच्या वतीने पुण्यात राज्यपालांच्या विरोधात आंदोलन करण्यात येतंय.
राज्यपालांच्या विधानाने विश्व हिंदू मराठा संघ आक्रमक झालाय. राज्यपालांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. तसंच राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या विधानानंतर आंदोलन करण्यात आलं. आंदोलन करणाऱ्या सगळ्यांना आंदोलांना पोलीसांनी ताब्यात घेतलंय.
पुण्यातील चतु:र्शृंगी मंदिरापासून राजभवनापर्यंत अंतयात्रा काढण्यात येणार होती मात्र त्या आधीच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नव्हती. मात्र तरिही हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
तुम्हा तरूण मुलांना जर कुणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळतील, असं वादग्रस्त वक्तव्य भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.
कोश्यारी यांच्या विधानानंतर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.