पुण्यात ठेकेदारांचा कामचुकारपणा; खड्ड्यात डांबर न टाकता केवळ खडी टाकत खड्डे बुजवले

| Updated on: Jan 26, 2022 | 4:13 PM

रस्त्यांच्या सुरु असलेल्या कामामुळे रस्त्याच्या बाजुला असलेली दुकानदारही वैतागले आहेत. या कामांमुळे धुळीचे लोट उडत आहेत. या धुळीचा नाहक स्टत्रास आम्हाला सहन करावा लागत आहे. काम कधी संपतेय याचे वाट पाहतोय असा त्रागा दुकानदारांकडून व्यक्त केला जातोय

पुण्यात ठेकेदारांचा कामचुकारपणा;  खड्ड्यात डांबर न टाकता केवळ खडी टाकत खड्डे  बुजवले
Road work
Follow us on

पुणे – मागील काही दिवसांपूर्वी कामचुकारपणा करत रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे केल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media ) व्हायरल झाला आहे. असाच काहीसा प्रकार पुण्यात(Pune)  घडलेला प्रकार समोर आला आहे. शहरात सद्यस्थितीला ठीकी ठिकाणी रस्त्याची कामे सुरु आहे. या कामाचा नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत. या कामामुळे वाहतूक कोंडी (Taffic)होत असून, धुळीचा सामनाही करावा लागत आहे.

डांबर न टाकता केवळ खडीने बुझावले रस्ते
शहारातील खंडोजीबाबा चौकात खड्डे बुजविण्याचे काम काही कामगार करत होते. कामगार घाईघाईत खड्ड्यात डांबर न टाकता केवळ खडी टाकत हाेते. त्याविषयी विचारले असता ते कामगार म्हणाले, आम्हाला वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून त्वरित खड्डे बुजवायला सांगितले आहेत.   खड्ड्यात डांबर न टाकता खडी कशी काय टाकत आहात,  ती खडी पुन्हा वरती येईल, असे त्यांना विचारले असता कामगार म्हणाले, हे काम असेच करायला सांगितले आहे.  यावरून स्पष्ट होते की, रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आणि कसेही केले जात असल्याचे समोर आले आहे.

दुकानदार वैतागले
रस्त्यांच्या सुरु असलेल्या कामामुळे रस्त्याच्या बाजुला असलेली दुकानदारही वैतागले आहेत. या कामांमुळे धुळीचे लोट उडत आहेत. या धुळीचा नाहक स्टत्रास आम्हाला सहन करावा लागत आहे. काम कधी संपतेय याचे वाट पाहतोय असा त्रागा दुकानदारांकडून व्यक्त केला जातोय.  टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, खंडोजीबाबा चौक आदी ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. लॉकडाऊनमध्ये झालेली कामे देखील तशीच आहेत. ती पूर्ण करण्यात आली नाहीत. त्यामुळे रस्त्यांवर खड्डेचखड्डे पहायला मिळत आहेत. चांगला असलेला टिळक रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदला होता. जलवाहिनी टाकल्यावर मात्र तो पूर्वीसारखा तयार केला नाही. त्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

IND vs WI: भारताचा ‘हा’ स्टार खेळाडू वेस्ट इंडिजला सीरीजला मुकणार?

Nashik Crime | डॉ. सुवर्णा वाजेंनी पतींना रात्री तसा मेसेज का पाठवला, त्यांच्यासोबत कोण होते, मृत्यूचे गूढ काय?

10000 रुपयांहून कमी किंमतीत 6GB रॅम असलेले स्मार्टफोन, Realme, OPPO, Micromax चे पर्याय