पुणे : घोडीवर स्वार होत बैलगाडा शर्यतीचा थरार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी अनुभवला आहे. यावेळी बैलगाडा शर्यतीला सुरुवात झाल्यानंतर एकच जल्लोष झाला. अमोल कोल्हेंनीही आपली घोडेस्वारीची कौशल्य दाखव दोन्ही हात सोडून यावेळी बारी मारली. बैलगाडा शर्यतीत (Bullock cart Race) अमोल कोल्हे घोडीवर स्वार झाले. प्रचारावेळी दिलेला शब्द अमोल कोल्हे यांनी अखेर पूर्ण केलाय. बैलजोडीसमोर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बारी मारली आली. यावेळी फोटोसेशनही पार पडलं. घोडीवर बसून अमोल कोल्हे (Amol Kolhe Horse riding) यांनी जोरदार फोटोसेशनही केलंय. अढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांना आव्हान दिलं होतं. हे आव्हान स्वीकारत अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीत घोडीवर स्वार होण्याचा शब्द दिला होता. त्यानुसात ते आज निमगाव दावडीतील बैलगाडा शर्यतीत सामील झाले.
यावेळी पुणे जिल्ह्यात असलेल्या निमगावातील असंख्य लोकं बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी जमले होते. या शर्यतीचं प्रमुख आकर्षण हे डॉ. अमोल कोल्हेही होते. लोकांना हात दाखवून, साद घालत अमोल कोल्हे यांनी फोटोसेशनही केलं. अखेर खासदार अमोल कोल्हे यांनी आपला दिलेला शब्द पूर्ण केलाय. मांड टाकून घोडीवर स्वार होत अमोल कोल्हे यांनी बुकही ठोकली.
यानंतर बैलगाडा शर्यत सुरु होता, कोल्हेंनी घोडीवर बारी मारली. अंगावर काटा आणणारा हा क्षण लोकांनी पाहिला. यानंतर एकच जल्लोष झाला. बैलगाडा शर्यत सुरु झाल्यावर घोडीवर वेगानं स्वार होत, वाऱ्याची संवाद साधत दोन्ही हात सोडून अमोल कोल्हेंनी या थराराचा अनुभव घेतला. घोडीवर स्वार होत बारी मारुन अमोल कोल्हेंनी या शर्यतीत भाग घेत संपूर्ण थरार अनुभवला. विजयी मुद्रा करत अभिवादन करत अमोल कोल्हेंनी यावेळी उपस्थितांना सादही घातली.
आधीही शिरुरमध्ये बैलगाडा शर्यत झाली होती. तेव्हा हजेरी न लावल्यामुळे अमोल कोल्हे यांच्यावर टीकाही झाली होती. दरम्यान, अखेर निमगावातील बैलगाडा शर्यतीत सहभागी होत त्यांना मनमुदार या शर्यतीचा आनंद लुटलाय.
बैलगाडा शर्यतीहून परतताना काळाचा घाला, पुण्यात 16 जणांसह निघालेल्या पिकअपचा टायर फुटला आणि…
Pune Bullock Cart Race | मावळमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार, शर्यत पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी
Video : सिंधुदुर्गात पोलीस अधीक्षकांनी हाकला शर्यतीचा बैलगाडा, कोकणातल्या पहिल्या शर्यतीत धुरळा