PUNE | पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद, दिवसभर दुरुस्तीचे काम

| Updated on: Feb 09, 2021 | 7:47 AM

महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी संपूर्ण पुणे शहराचा (Pune city) पाणीपुरवठा (water supply) बंद राहणार आहे. (Pune water supply cut off)

PUNE | पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद, दिवसभर दुरुस्तीचे काम
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

पुणे : महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी संपूर्ण पुणे शहराचा (Pune city) पाणीपुरवठा (water supply) बंद राहणार आहे. विद्युत आणि तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्यामुळे हा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. (water supply of Pune city will be cut off on Thursday)

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेचे विद्युत आणि तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी संपूर्ण दिवसभर पूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ही अधिकृत माहिती पुणे महानगरपालिकेने दिली असून शुक्रवारी सकाळी उशिराने कमी दाबाने पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत केला जाण्याची शक्यता आहे. गुरुवारी वडगाव, चतुःश्रृंगी, वारजे जलकेंद्र परिसर येथे विद्युत आणि तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम होणार आहे.

या भागाचा पाणीपुरवठा बंद असणार

वडगांव जलकेंद्र परिसरातील हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार तसेच दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा या भागातही पाणीपुरवठा बंदच राहील. तसेच, चतुःश्रृंगी /एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र परिसरातील पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रृंगी परिसर, गोखले नगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधान, बाणेर, चांदणी चौक परिसर, किष्किंदा नगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परीसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे युनिर्व्हसिटी परीसर, वारजे हायवे परीसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्लयुलर नगर, अतुल नगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुध्दीकरणाचा परीसर, औंध बावधन, सुस, सुतारवाडी, भुगाव रोड या परिसरातही गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहील.

दरम्यान, गुरुवारी पाणीपुरवठा बंद केला जाणार असल्यामुळे पाण्याची चंटाई निर्माण होऊ शकते. ही शक्यता लक्षात घेता पुणे महानगरपालिकेने नागरिनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

 

इतर बातम्या :

Farmers protest: नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट उद्या बंद; माथाडी कामगारही संपावर

मुंबई, ठाण्यातील शाळा बंद, मग उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थी-पालकांची काळजी सरकारला नाही का? भाजपचा सवाल

Bharat Bandh : मुंबईकरांना आज दूध आणि भाजीपाला मिळणार का? पाहा राज्याचा रिअ‍ॅलिटी चेक

(water supply of Pune city will be cut off on Thursday)