संभाजीराजे आणि अजित पवारांच्या बैठकीवर समाधानी नाही; मराठा आरक्षण संघर्ष समिती आंदोलनावर ठाम

| Updated on: Jun 21, 2021 | 2:05 PM

एकीकडे खासदार संभाजी छत्रपती यांच्या राज्य सरकारसोबत बैठका आणि मूक मोर्चे सुरू असतानाच मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील (sureshdada patil) यांनी मात्र वेगळाच सूर आळवला आहे.

संभाजीराजे आणि अजित पवारांच्या बैठकीवर समाधानी नाही; मराठा आरक्षण संघर्ष समिती आंदोलनावर ठाम
sambhaji chhatrapati
Follow us on

कोल्हापूर: एकीकडे खासदार संभाजी छत्रपती यांच्या राज्य सरकारसोबत बैठका आणि मूक मोर्चे सुरू असतानाच मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी मात्र वेगळाच सूर आळवला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संभाजीराजे यांच्या बैठकीवर आम्ही समाधानी नाही. घरात बसलो तर काहीच मिळणार नाही याची आम्हाला खात्री झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत काही मिळत नाही, तोपर्यंत चर्चांना अर्थ नाही, असं सुरेश पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच मराठा आरक्षणासाठीच्या रस्त्यावरच्या लढाईवर आपण ठाम असल्याचंही सुरेश पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. (we are not happy sambhaji chhatrapati and ajit pawar meeting over maratha reservation)

मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षण संघर्ष समिती आणि मराठा आरक्षण समन्वय समितीने 12 मागण्या राज्य सरकारकडे केल्या होत्या. त्यापैकी 8 मागण्या मान्य केल्याचं सांगून गेल्या वर्षी राज्य सरकारने आमच आंदोलन थांबवलं. मात्र यातील एक ही मागणी अद्याप पूर्ण केली नाही. आंदोलन करायला लागलो तर सरकार पोकळ आश्वासन देऊन पानं पुसण्याचं काम करतं. त्यामुळे जोपर्यंत आरक्षणाची धार वाढवली जाणार नाही, तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही आणि हा प्रश्न सुटणार नाही, असं पाटील म्हणाले.

जातीय तेढ निर्माण

राज्यातील आघाडी सरकार विश्वासघातानं आलं आहे. हे सरकार आल्यापासून राज्यात जातीय तेढ कशी निर्माण होईल, असं वातावरण तयार केलं जात आहे. ओबीसींचं आरक्षण घालवलं. मराठ्यांचं आरक्षण घालवलं. केवळ तारखांवर तारखा घेतल्या, अशी टीका त्यांनी केली.

25 तारखेला मुंबईत गोलमेज परिषद

येत्या 25 तारखेला मुंबईत गोलमेज परिषद घेण्यात येणार आहे. त्यात आंदोलनाची दिशा ठरणार आहे. या गोलमेज परिषदेला माजी मुख्यमंत्री नारायण राणे उपस्थित राहणार आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनाही परिषदेला आमंत्रित केलं जाणार आहे, असं सांगतानाच प्रश्न सुटेपर्यंत रस्त्यावरचं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच केंद्राविरोधात आंदोलन करावं लागलं तर तेही करू, पण सध्या प्रश्न राज्याचा आहे. त्यामुळे राज्य सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे, असं त्यांनी सांगितलं.

समाजाला रस्त्यावर उतरवायचे का?

दरम्यान, खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वात आज नाशिकमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाला नाशिकमधील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर संभाजी छत्रपती यांनी ही घोषणा केली. आरक्षणसााठी ज्या समाजाने 58 मोर्चे काढले. तो समाज आज बाजूला फेकला गेला आहे. जातीय विषमताही वाढत आहे. त्यामुळे आरक्षण मिळावं अशी आमची भूमिका आहे. समाजाने दु:ख मांडलं. त्यामुळे पुन्हा समाजाला रस्त्यावर उतरवायचे का? असा सवाल करतानाच आक्रोश करायला, मोर्चे काढायला दोन मिनिटं लागतात. पण तसं न करता आजवर आम्ही बोललो आता लोकप्रतिनिधींनी बोलावं म्हणून हे आंदोलन केलं जात आहे, असं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं. (we are not happy sambhaji chhatrapati and ajit pawar meeting over maratha reservation)

 

संबंधित बातम्या:

VIDEO: 36 जिल्ह्यात आंदोलन करण्याची इच्छा नाही, पुढची दिशा आज ठरणार; खासदार संभाजी छत्रपती यांची घोषणा

मराठा मोर्चात जाऊन भुजबळ म्हणाले, आक्रोश मोर्चे मराठ्यांविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकते, गिरीश बापटांना विश्वास

(we are not happy sambhaji chhatrapati and ajit pawar meeting over maratha reservation)