पुणे: राज्य सरकार माझ्याकडे 12 सदस्यांच्या नियुक्तीचा आग्रह धरत नाही. तुम्ही का आग्रह धरता?; असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेत्याला केला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या मुद्द्यावरून राज्यपालांवर टीका केली होती. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर भाष्य केलं आहे. मी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांना भेटणार आहे, असं अजित पवार यांनी आज स्पष्ट केलं. (we will meet governor to next week, says ajit pawar)
अजित पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या मुद्द्यावरून राज्यपालांनी केलेल्या विधानाबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं. राज्यपालांवर मला बोलण्याचा अधिकार नाही. पण पुढच्या आठवड्यात मी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना जाऊन भेटणार आहोत, असं अजित पवार म्हणाले.
यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही प्रत्युत्तर दिलं. शरद पवार साहेबांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. कधी तरी काही लोकं असं बोलून जातात, मात्र त्याला महत्व देण्याचं काम नाही, अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. आम्ही पुरोगामी आहोत. पुरोगामी विचारानेच आम्ही काम करत असतो, असंही त्यांनी सांगितलं.
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे खासदार गिरीश बापट आणि काँग्रेस नेते शरद रणपिसेही उपस्थित होते. कार्यक्रमानंतर रणपिसे यांनी राज्यपालांची भेट घेऊन 12 सदस्यांची नियुक्ती करण्याची विनंती केली. या सदस्यांना विधान परिषदेत येण्याचा मार्ग मोकळा करावा, असंही ते म्हणाले. त्यावर राज्यपालांनी रणपिसे यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं. अजित पवार माझ्याबरोबर आहेत. ते माझे मित्रं आहेत. ते इथेच आहेत. सरकार याबाबत आग्रह धरत नाहीत. तुम्ही का आग्रह धरता?, असा सवाल राज्यपालांनी केला. या विषयावर राज्य सरकारने पाठपुरावा केला पाहिजे, असं त्यांनी रणपिसेंना सांगितलं. (we will meet governor to next week, says ajit pawar)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 20 August 2021 https://t.co/9l6lHBm7wF #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 20, 2021
संबंधित बातम्या:
राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीयवाद वाढला, आता अजित पवारांचं ‘दादा स्टाईल’ उत्तर
(we will meet governor to next week, says ajit pawar)