पुणे – शहरात उन्हाचा तडाखा वाढत असल्यामुळे दूधापासून तयार करण्यात येणाऱ्या थंड पेयांना मागणी वाढलीय. पुण्यातील कात्रज डेअरीकडून(Katraj Dairy) उत्पादित होत असलेल्या चार टन आईस्क्रीम(Ice-cream) आणि पाच टन दह्याची दररोज विक्रमी विक्री होत आहे, शिवाय दिवसाला36 लिटर म्हणजेच 90 हजार पिशव्या ताक(Butter Milk) पुणेकर फस्त करत आहेत, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणांत सॉफ्टी आईस्क्रीमचीही विक्री होत असल्याची माहिती कात्रज डेअरीचे संचालक कालिदास गोपाळघरे यांनी दिलीय. नागरिकांकडून शरीराला थंड ठेवणाऱ्या पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यावर भर दिला जात आहे. कात्रज डेअरीबाबत लोकांच्या मनामध्ये विश्वासाहर्तेमुळे त्याचे प्रॉडक्ट खरेदी करण्यावर भर दिला जात आहे.
कोरोनामुळे गेली दोन वर्षाच्या काळात लॉकडाऊन तसेच कोरोनाच्या निर्बंधामुळे विक्रीचे प्रमाणही अत्यंत कमी होते. कोरोना आटोक्यात आल्यानंतर राज्य सरकारने कोरोनावरील निर्बंध हटवले. बाजारपेठा पुन्हा गजबजू लागल्या. या सगळ्याचा परिणाम विक्रीवर झाला असून विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनानंतर पहिल्यांदा विक्रीत वाढ झालेली आहे. पुण्याची लोकसंख्या पाहता कात्रज डेअरीचा प्रकल्प सध्या कमी पडत असून या प्रकल्पासाठी नवीन निधी मंजूर झाला असून लवकरच प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात येणार असल्याची माहिती गोपाळघरे यांनी सांगितले आहे.
दुसरीकडं यंदा उन्हाच्या तीव्र झळांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. वाढत्या तापमान वाढीमुळे अनेकदा उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झालेले दिसून आले. याचाच परिणाम म्हणजे नागरिकांकडून शरीराला थंड ठेवणाऱ्या पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यावर भर दिला जात आहे. कात्रज डेअरीबाबत लोकांच्या मनामध्ये विश्वासाहर्तेमुळे त्याचे प्रॉडक्ट खरेदी करण्यावर भर दिला जात आहे.