पुणे – पुणे महानगरपालिकेचा (Pune Municipal Corporation) पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने महापालिकेत प्रशासकाची नेमणूक झाली आहे. नगरसेवकांचा कार्यकाळ संपताच प्रशासक सक्रिय झाले आहेत. शहरात नगरसेवकांच्या (Corporators) आश्रयामुळे ठिकठिकाणी बुरशीसारख्या पसरलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. रस्ते, पदापथावर , गल्ली- बोळात पसरलेली अतिक्रम काढण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. अतिक्रमण काढण्याबरोबरच महानगरपालिका येत्या काळात शहरात वाढलेल्या अनाधिकृत बांधकामावरही (Unauthorized construction)हातोडा चालवणार आहे. शहर अतिक्रमणमुक्त करण्यावर भर देण्यात येणार आहे. ठिकठिकाणी उभारण्यात आलेली अतिक्रमणे काढून घेण्याचे आदेशही देण्यात आले आहे. अन्यथा तोडण्याचा इशारा अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांंनी दिला आहे.
शहरातील राजकीय पुढाऱ्यांच्या वरदहस्तामुळे ठीकठिकाणी अतिक्रमणे, अनाधिकृत बांधकामे वाढली आहेत. मात्र याचा नाहक त्रास सर्वसामान्य व पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अतिक्रमणे करून रस्ते अडविणाऱ्यांवर आता दररोज कारवाई होणार आहे. प्रशासन वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमणांसह, पदपथ आणि मोकळ्या जागांवर दुकान मांडणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. यात अनधिकृत बांधकामांचाही समावेश आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास आठवड्यातील दोन दिवस निश्चित करून देण्यात आले आहेत. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे. या कारवाईबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत.
रस्त्यावरील पदपथावर भाजी विक्रेत्यांसह , छोटे व्यापारी यांनी पदपथ काबीज केल्याचे चित्र शहरात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत . यामुळे अनेकदा नागरिकरस्त्यावरच वाहने थांबवत भाजीपाल्याची खरेदी करता. यामुळेअपघाताचे प्रमाण वाढले असून मोठया प्रमाणात वाहतूक कोंडीही होत आहे. यापूर्वी या लोकांवर कारवाई केल्यास लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करत कारवाई थोपवत असत.
VIDEO: राज्यपाल राजकारण करताहेत, त्यांना पदावर ठेवणं अयोग्य; संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल
महिन्याच्या ‘त्या’ वेदनांकडे दुर्लक्ष नकोच… या गंभीर आजाराचे संकेत
नियतीने पाहिली परीक्षा; वडिलांचा मृतदेह घरात असताना ‘त्याने’ सोडविला दहावीचा पेपर