इंदापूर- गेल्या अनेक दिवसांपासून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे(Minister of State Dattatraya Bharne) कोणत्या ना कोणत्याही कारणामुळे चर्चेत आहेत. कधी बैलगाडी चालवल्यामुळं तर कधी शिवजयंतीत कार्यकर्त्यांबरोबर भगवा हातात झेंडा घेऊन डान्स केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळं. त्यानंतर आता इंदापूर (Indapur ) शहरातील ग्रामदैवत श्री इंद्रेश्वर यात्रा च्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरचे ग्रामदैवत इंद्रेश्वराच्या दर्शनासाठी आले होते. त्या दरम्यान शेजारीच असणाच्या वडापाव सेंटर येथे जात चांगलाचं ताव मारला. यावेळी भरणे यांनी तेथे उपस्थित असणारे सर्व पत्रकार बोलावले व पत्रकारांसोबत त्यांनी यावेळी वडापाव वर ताव मारला,एवढ्यावरचं न थांबता भरणेमामांनी वडापावचे बिल देत थेट भाजपाच्या(BJP) नेतेमंडळींवर निशाना साधला. ‘राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वडापाव वर ताव मारत मी बिल देणार आहे बरं का असं खमकावून सांगितले आणि आपल्या स्वीय्य सहाय्यक अनिकेत जाधव यांस बील द्यायला लावून भरणे मार्गस्थ झाले.
ठाणे स्टेशनबाहेर नुकत्याच भाजपच्या मंत्री, खासदार, आमदारासंह कार्यकर्त्यांनी 200 वडापाववर ताव मारला पण बील न देताच ही मंडळी तिथून निघून गेली. त्यानंतर याबाबतचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला सगळे निघून गेल्यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी व्हीडिओ तयार केला होता. त्यामुळं याबाबत सगळीकडं चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर कार्यकर्त्यांनी प्रकरण वाढू नये म्हणून तिथं जात बिल भरले होते. या प्रकरणाला हात घालत नंतर आमदार रोहित पवार यांनी निशाना साधला होता. यावेळी इंद्रेश्वर मंदीराचे ट्रस्टी, पत्रकार व नागरिक उपस्थित होते. यावेळी हॉटेल इंद्रेश्वरचे मालक शिवभक्त बाळासाहेब भिसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
राज्यपालांनी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या, त्वरित विधान मागे घ्या; उदयनराजे भोसले यांची मागणी