खेड/पुणेः सध्या सोशल मीडियामुळे आपल्याला अनेक गोष्टी समजत असल्या तरी त्याच सोशल मीडियामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. पावसाळ्यातील दिवसात, वाहनांवर, पर्वत रागांवर आणि इतर अनेक ठिकाणी फोटो आणि व्हिडीओ करण्याच्या नादात अनेक जणांचा जीव गेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रिल्स बनवण्याचं वेड शहरापासून खेड्यागावापर्यंत पोहचलं आहे.
मात्र हे व्हिडीओ, फोटो आणि इतर गोष्टी करत असताना जीवाची पर्वा न करता केल्यावर तो व्हिडीओ आणि फोटो कसा जीवावर बेतू शकतो त्याचे आजच एक उदाहरण घडले आहे. सध्या होळी सण साऱ्या राज्यभर जोरदार आणि मोठ्या आनंदात साजरे केले जात आहेत.
त्यातच आज रंगपंचमी असल्यामुळे अनेक तरुण तरुणी नदी घाटावर नाही तर धरणावर जाताना दिसत होते. त्यामुळे खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणावरही काही तरुण मित्रांसह गेले होते.
त्यावेळी त्या मित्रांमधील दत्ता भारती या तरुणाला रिल्स बनवण्याची इच्छा झाली. त्यानंतर त्याने मोबाईलवर रिल्स बनवण्यासाठी तो धरणाच्या एका ठिकाणी गेला होता. त्यावेळी धरणावर उभा असताना पाय घसरल्याने रिल्स बनवताना तो धरणाच्या पाण्यात पडला.
त्यानंतर धरणावर आलेल्या आणि इतर नागरिकांनी आरडाओरड केला. यावेळी काही तरुणांनी दत्ता भारतीला वाचावण्याचाही काही जणांनी प्रयत्न केला मात्र तो पाण्यात बुडाला. त्यानंतर खेड तालुक्यातील आपत्ती निवारण टीमला पाचरण करण्यात आले.
त्यानंतर पाण्यात दत्ता भारतीचा शोध घेण्यात आला. काही वेळ शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आपत्ती निवारण टीमला यश आले.