पुणे – राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या (Zilla Parishad school teachers)बदल्या ॲप (App) माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या बदलीसाठी हे ॲप विकसित करण्यात आले आहे. येत्या दोन आठवड्यात या ॲपचे काम पूर्ण होणार आहे. हा मसुदा मोबाईल व डेस्कटॉप अश्या दोन्ही ठिकाणी वापरता येणार आहे. त्यामुळे येत्या मे महिन्यापासून या ॲपच्या माध्यातून शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत अशी माहिती ग्रामविकास विभागाने दिली आहे. या मोबाईल ॲपच्या प्रगतीचा आढावा घेण्याचे काम ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif)यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुक्त आयुष प्रसाद व सातारा जिल्हा परिषदेचे कार्यकारी आयुक्त विनय गौडा यांना दिले होते . त्यानुसार माहिती घेऊन ॲपच्या प्रगतीबद्दल माहिती सांगितली आहे.
या ॲपमधून बदलीच्या अर्जापासून बदलीच्या ठिकाणी नियुक्त होईपर्यंत सर्व प्रक्रिया ॲपद्वारेच पार पडणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बदलीचे काम पारदर्शी होण्यास मदत होईल. तसेच बदलीची संपूर्ण प्रक्रिया शिक्षकांना घर बसल्या पाहता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे 31 मी पूर्वी शिक्षकांच्या बदल्या होतात. यंदाही वेळेतच या बदल्या होणार आहेत, मात्र त्या ॲपच्या माध्यमातून पार पडणार आहे. असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्यातील जिल्हा परिषदमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्हा अंतर्गत बदलीचे नवीन धोरण राज्य सरकारने मागील वर्षी निश्चित केले होते. त्या अनुषंगाने नवीन अद्ययावत सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी कंपनीची नेमणूक करण्यात अली होती. त्याबरोबर एक समितीची नेमणूकदेखील करण्यात आली होती. या वर्षी त्या सॉफ्टवेअर अपडेटचे काम सुरू आहे. त्याच्यामध्ये शिक्षकांची पारदर्शक माहिती असणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी सांगितले.
Secure investment : जेवढी रिस्क तेवढा अधिक परतावा; गुंतवणुकीचा कोणता मार्ग सुरक्षीत? जाणून घ्या
Zodiac | ‘या’ राशीच्या लोकांनी सावध होण्याची गरज, प्रेमभंग होण्याची दाट शक्यता!