सातारा: जिल्ह्यातील पुसेगाव- म्हासुर्णे मार्गावर एका दिवसात 30 किलोमीटर रस्ता तयार करण्याचा विक्रम करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या एकसष्टीनिमित्त राजपथ इन्फ्राकॉन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याला अनोख्या स्वरूपात अभिवादन केले आहे. या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही झाली आहे. या अनोख्य विक्रमाबद्दल राजपथ इन्फ्राकॉन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीं माहिती देण्यात आली. (PWD and Rajpath Infracon make record by making road construction world record in Satara )
सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे या मार्गावर चोवीस तासात 30 किलोमीटर लांबीचा रस्ता एका दिवसात तयार करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने विश्वविक्रम स्थापित केला आहे. या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही झाली आहे. रविवारी दि. 30 मे रोजी सकाळी 7 वाजलेपासुन रात्री 2 वाजे पर्यंत डांबरीकरण करण्यात आलं. या आधीचा विश्वविक्रम हा 25. 54 किलोमीटरचा आहे. पुसेगाव, जायगाव, औंध, म्हासूर्णे साडेतीन मीटर रुंद आणि 47 किलोमीटर लांबीचा असा हा रस्ता आहे. त्यापैकी तीस किलोमिटरचा रस्ता एका दिवसात तयार करण्यात आला.
जवळपास 474 कामगार आणि 250 वाहने व मशिनरीच्या साहाय्याने हे काम पूर्ण करण्याचे सुरू आहे. कोविडसंदर्भात केंद्र व राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या विश्वविक्रमातून महाराष्ट्राच्या एकसष्टीनिमित्त राजपथ इन्फ्राकॉन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याला अनोख्या स्वरूपात अभिवादन केले आहे, असं सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार यांनी सांगितलं.
राजपथ टीमचं सूक्ष्म नियोजन
विक्रमी प्रयत्नांची अंमलबजावणी करण्यासाठी राजपथ टीमने सूक्ष्म नियोजन केले. 30 किलोमीटरच्या या रस्त्याला सहा तुकड्यांमध्ये विभागण्यात आले. प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पथक होते. या कामासाठी एकूण 11 हजार मेट्रीक टन बिटुमन काँक्रीट, त्यासाठी आठ हॉट मिक्स प्लांट होते. काँक्रीटचे हे मटेरीअल पसरविण्यासाठी सही पेव्हर, 12 टँडम रोलर व 6 पीटीआर वापरण्यात आले. या मटेरीअलची ने-आण करण्यासाठी एकूण 180 हायवा टिप्पर गाडी वापरण्यात आले.
प्रकल्प व्यवस्थापक, तीन हायवे इंजिनिअर, दोन क्लालिटी इंजिनिअर, दोन सर्व्हेअर आणि 71 कर्मचारी असे एकूण 79 कर्मचारी एका टीममध्ये होते. एकूण सहा भागांचे मिळून 474 कर्मचारी पुर्ण कामासाठी तैनात होते. यासाठी व्यवस्थापन थिंक टँक व वॉर रूम उभारण्यात आली होती.
कृष्णा साखर कारखाना निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी उमदेवारांची लगबग, सत्ताधारी पॅनेल विरोधात विरोधकांची एकजूट?https://t.co/WVta1jhT9B#Satara | #Corona | #Kirshna | #Election
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 31, 2021
संबंधित बातम्या:
Maharashtra Lockdown : राज्यातील लॉकडाऊन वाढवला, 15 जूनपर्यंत निर्बंध कायम राहणार
(PWD and Rajpath Infracon make record by making road construction world record in Satara )