भाजपच्या मंत्र्याने केला सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित असल्याचा दावा, तांबे यांना पक्षप्रवेशाची खुली ऑफर देणारे मंत्री कोण?

| Updated on: Jan 30, 2023 | 12:28 PM

भाजपचे नेते तथा मंत्री यांनीच माध्यमांना सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित असल्याचे म्हंटले आहे, त्यात मामाची भूमिकाही भाजप नेत्याने बजावल्याची चर्चा अहमदनगरमध्ये सुरू आहे.

भाजपच्या मंत्र्याने केला सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित असल्याचा दावा, तांबे यांना पक्षप्रवेशाची खुली ऑफर देणारे मंत्री कोण?
Image Credit source: Google
Follow us on

अहमदनगर : आम्हाला शंभर टक्के खात्री आहे, सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित आहे अशी खळबळजनक प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सत्यजित तांबे यांचाच विजय होणार असल्याचे सांगत बाळासाहेब थोरात यांना टोला लगावला आहे. तांबे यांच्या मामाने पक्षालाच मामा बनवलं असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हंटलं आहे. तर दुसरीकडे सत्यजित तांबे यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी आमची इच्छा आहे अशी प्रतिक्रिया देऊन राधाकृष्ण विखे पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे. सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित असल्याने इतर उमेदवार यांची चर्चा करण्याची गरज नाही. सत्यजित तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांची भूमिका बजवावी लागली का? असा सवाल विचारात राधाकृष्ण विखे पाटील यांनी मामाची भूमिका बजवण्यापेक्षा मामाने पक्षाला मामा बनवलं आहे असं म्हणून बाळासाहेब थोरात यांना चिमटा काढला आहे.

बाळासाहेब थोरात यांची भूमिका काय असेल माहिती नाही, पण त्यांची भूमिका व्यक्तिगत आहे. मात्र, सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित आहे असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टच सांगितलं आहे.

स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असे पक्षाच्या वतिने जाहीर करण्यात आले होते, त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे सांगितले आहे अशी प्रतिक्रिया यापूर्वीही राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली होती.

हे सुद्धा वाचा

त्यामुळे सत्यजित तांबे यांना भाजपने उघड पाठिंबा दिल्याची परिस्थिती बाळासाहेब थोरात आणि विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात आहे, याचाच आधार घेऊन भाजपनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विजयाचा दावा केला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्या भाच्याला म्हणजेच सत्यजित तांबे यांना उघड पाठिंबा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

खरंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यात विळ्या भोपळ्याचे नातं आहे, त्यात सत्यजित तांबे यांच्यासाठी विखे पाटील मामाची भूमिका बजावत असल्याची चर्चा आहे, त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणूक अधिकच चर्चेत आली आहे.