नरेंद्र मोदींच्या माफीनाम्यावर राहुल गांधींचा प्रहार; RSS चा दाखला देत म्हणाले…

| Updated on: Sep 05, 2024 | 3:14 PM

Rahul Gandhi on PM Narendra Modi Statement : नरेंद्र मोदींच्या माफीनाम्यावर राहुल गांधींनी प्रहार केलाय. सांगलीतील कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी RSS चा दाखला देत नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. राहुल गांधी नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

नरेंद्र मोदींच्या माफीनाम्यावर राहुल गांधींचा प्रहार; RSS चा दाखला देत म्हणाले...
नरेंद्र मोदी, राहुल गांधी
Image Credit source: Facebook
Follow us on

महाराष्ट्रासह देशाचं प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुतळा कोसळला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर केवळ आठच महिन्यात हा पुतळा कोसळला. त्यानंतर शिवप्रेमी आणि विरोधक आक्रमक झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर कार्यक्रमातून माफी मागितली. यावर आज राहुल गांधींनी शाब्दिक हल्ला चढवला आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळण्याच्या अनावरण कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र डागलं आहे.

राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

गेल्या साठ वर्षात त्यांनी तुमची माफी मागितली नाही. कारण गरज पडली नाही. ज्याने चूकच केली नाही त्यांनी माफी कशाची मागायची. राज्यात काही दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांची मूर्ती बनवली. पंतप्रधानांनी माफी मागितली. पंतप्रधानांनीस कोणत्या कारणाने माफी मागितली. वेगवेगळी कारणे असतील. पहिलं कारण ही मूर्तीचं कंत्राट संघाच्या कार्यकर्त्याला दिलं. पंतप्रधान मोदींना हे सांगायचं असेल मला हे कंत्राट संघाच्या कार्यकर्त्याला द्यायचं नव्हतं. मेरीटमध्ये द्यायचं होतं. दुसरं कारण मूर्तीच्या कामात भ्रष्टाचार झाला होता. मी ज्याला कंत्राट दिलं त्याने भ्रष्टाचार केला हे कारण असेल. म्हणून माफी मागितली, असं राहुल गांधी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण म्हणून मूर्ती बनवली. पण ती उभी राहू शकेल एवढंही लक्ष दिलं नाही. पतंगराम कदम यांचा पुतळा बनवला. तुम्ही ५० वर्षानंतर या हा पुतळा असाच असेल. सर्वात मोठे महापुरुष शिवाजी महाराज यांचा पुतळा बनवतो. काही दिवसात भ्रष्टाचारामुळे, चुकीच्या व्यक्तीला कंत्राट दिल्याने मूर्ती पडते, असा आरोप राहुल गांधींनी केलाय.

मोदींनी प्रत्येकाची माफी मागावी- राहुल गांधी

शिवाजी महाराजांचा अपमान झाला. त्यांनी फक्त शिवाजी महाराजांची माफी मागू नये. राज्यातील प्रत्येक व्यक्तीची माफी मागितली पाहिजे. मोदींना हे सांगितलं पाहिजे, तुम्ही फक्त दोनच माणसांचं सरकार का चालवता. मोठी कंत्राट अदानी आणि अंबानीला मिळतात, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

जिथे पाहाल तिथे भ्रष्टाचार आहे. बाहेरचे लोक इथे येऊन कंत्राट घेत आहेत. आपल्याला हे बदलायचं आहे. तुम्ही राज्यात जनतेचं सरकार आणणार आहात. शेतकरी, बेरोजगार आणि प्रत्येक वर्गाचं सरकार तुम्ही आणणार आहात. तुम्हाला जिथे गरज असेल मी येईल. तुम्ही फक्त ऑर्डर द्या, असं राहुल गांधी म्हणाले.