इर्शाळवाडी, रायगड | 20 जुलै 2023 : रायगड जिल्ह्यात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. खालापूरमधल्या इर्शाळवाडी गावात ही दुदैवी घटना घटली आहे. या घटनेची माहिती मिळताच आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले. सकाळपासूनच ते या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून होते. अधिकाऱ्यांना आणि स्थानिक प्रशासनाला ते सूचना देत होते. खालापूरमध्ये त्यांनी एक बैठकही घेतली. मात्र ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे सध्या पोहोचले आहेत. तिथे ते पाहणी करत आहेत.
इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. मात्र त्या ठिकीणी पोहोचण्यासाठी पक्का रस्ता नाहीये. पायी वाटेने इर्शाळवाडी गावात जावं लागतं. दीड तास पायी चालत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुर्घटनाग्रस्त भागात पोहोचले.
#रायगड जिल्ह्यातील #खालापूर जवळील #इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मदतकार्याला वेग देण्यासाठी मी स्वतः घटनास्थळी चालत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मी स्थानिक नागरिकांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन #एनडीआरएफ पथकाच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्याला वेग देण्यासाठी… pic.twitter.com/4AUCXf8gIU
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 20, 2023
इर्शाळवाडी गावात दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. अमित शाह यांनी इर्शाळवाडीतील दुर्घटनेची विचारपूस केली. त्यांचा सकाळीच मला फोन आला होता. केंद्राकडून आवश्यक असलेली सर्व मदत मिळण्याबाबत त्यांनी आश्वस्त केलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.
इर्शाळवाडी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटूंबीयांनी सरकारकडून पाच लाख रूपयांची मदत देणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं आहे.
इर्शाळवाडी दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. तसंच त्यांच्या तात्पुरत्या राहण्याचीही सोय करण्यात आली आहे. तसंच इर्शाळवाडीतील नागरिकांचं सरकारकडून लवकरच पुनर्वसन करण्यात येणार आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
#रायगड जिल्ह्यातील #खालापूर जवळील #इर्शाळगड गावात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली.
आज पहाटे या गावाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच या दुर्घटनेत सुदैवाने बचावलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. सरकार तुमच्या पाठिशी असून तुम्हाला लागेल ते सर्व सहकार्य… pic.twitter.com/z9mkpSWZ6b
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 20, 2023
इर्शाळवाडी दुर्घटनेबाबात एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. तसंच काही फोटोही शेअर केले आहेत.
इर्शाळवाडी येथील दरड कोसळलेल्या दुर्घटना स्थळाच्या दिशेने चालत असताना वाटेत काही ग्रामस्थ मला भेटले. त्यांची आस्थेने विचारपूस करून प्रत्यक्ष परिस्थिती देखील जाणून घेतली. तसेच त्यांना धीर देत सरकार तुम्हाला शक्य ती सारी मदत करेल असे आश्वस्त केले.
मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणे, शक्य तेवढ्या नागरिकांचे जीव वाचविणे याला राज्य सरकारचे प्राधान्य आहे. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार आम्ही केला आहे.
#इर्शाळवाडी येथील दरड कोसळलेल्या दुर्घटना स्थळाच्या दिशेने चालत असताना वाटेत काही ग्रामस्थ मला भेटले. त्यांची आस्थेने विचारपूस करून प्रत्यक्ष परिस्थिती देखील जाणून घेतली. तसेच त्यांना धीर देत सरकार तुम्हाला शक्य ती सारी मदत करेल असे आश्वस्त केले.
मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या… pic.twitter.com/ThsosJKc5t
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 20, 2023
इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची घटना घडून 15 तास उलटले आहेत. या दुर्घटनेत 17 घरं मलब्याखाली दबली गेली आहेत. 34 जणांना बाहेर काढण्यात NDRF च्या जवानांना यश आलं आहे. आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झालाय. तर 150 नागरिक बेपत्ता आहेत. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे इथे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
प्रशासनाने दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना 8108195554 या नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.