माणगाव, रायगड | 30 डिसेंबर 2023 : ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला आहे. ताम्हिणी घाटात बस पलटली आहे. रायगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठा अपघात झालाय. माणगाव नजीक ट्रॅवल्स बसचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झालाय. तर 55 जण जखमी झाले आहेत. जखमीना मानगाव उपजिल्हा रुग्णालयात हलवलं आहे. पुण्याहून हरिहरेश्वरला पर्यटनाला जात असताना बसला अपघात झाला आहे. पुणे येथील कंपनीची सहल खाजगी बसने हरिहरेश्वरला जात असताना बस उलटली आहे. या अपघातामुळे या मार्गावरही वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. आता ही वाहतूक पूर्वपदावर आहे.
माणगांव पोलीस ठाणे हद्दीत ताह्मिणी घाटात आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. सकाळी 07.30 वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल बस उलटली. ट्रॅव्हल्स क्रमांक MH 04 FK 6299 ही पुण्यावरून माणगावकडे येत होती. इतक्यात रस्त्याखाली उतरली आणि बस पलटी झाली. या बसचा भीषण अपघात झाला आहे.
पुण्यातील काही स्थानिक लोक सहलीसाठी जात होते. हरिहरेश्वरला शंकराचं दर्शन हे लोक घेणार होते. आज पहाटे ही बस पुण्याहून हरिहरेश्वरला निघाले. या बसमध्ये 57 प्रवासी प्रवास करत होते. पण ताम्हिणी घाटात आल्यानंतर चालकाचा बसवरचा ताबा सुटला अन् ही बस उलटली. यावेळी एकच गोंधळ पाहायला मिळाला. प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिपसरात घबराट पसरली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 55 जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांना माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयायात दाखल करण्यात आलं आहे.या मार्गावरची वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली. आता मात्र वाहतूक सुरळीत चालू आहे.
दरम्यान, परभणातही भीषण अपघात झाला आहे. परभणी जिल्ह्यात अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. परभणी-जिंतूर महामार्गावर धर्मापुरी जवळ एका टेम्पोचा आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. दरम्यान, प्रत्यक्ष दर्शनींनी या मोटारसायकलस्वाराला तातडीने ऑटोमधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केलं. या दुचाकीस्वारावर सध्या उपचार सुरु आहेत.