पनवेल : धरणावर पिकनिकला गेलेल्या तरुणांना धरणाच्या पाण्यात अंघोळ करणे चांगलेच महागात पडले आहे. धरणाच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरल्यानंतर पाण्याचा प्रवाहात दोघे वाहून जाऊ लागले. वाहत वाहत एका झुडुपाजवळ अडकून बसले होते. यादरम्यान पनवेल तालुका पोलिस ठाणे हद्दीतील नेरे बीटमध्ये पोलीस गस्त घालत होते. पोलिसांनी दोन तरुण पाण्यात अडकल्याचे पाहिले. यानंतर पोलिसांनी दोरीच्या सहाय्याने तरुणांना सुखरुप बाहेर काढले. सुदैवाने पोलीस वेळेत पोहचले म्हणून तरुणांचे प्राण वाचले. सोहेल खावजौद्दिन अहमद शेख आणि मनोज शंकर गांगुर्डे अशी त्या दोघांची नावे आहेत. नदी, समुद्र किनारे, धबधबे या ठिकाणी जाण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात येत असतानाही पर्यटक अतिउत्साहात तेथे जात असल्यामुळे या घटना घडतात.
मुंबईतील सोहेल खावजौद्दिन अहमद शेख आणि मनोज शंकर गांगुर्डे हे दोन तरुण पनवेलमधील गाढेश्वर धरणावर शनिवारी पिकनिकला गेले होते. यावेळी नदीत पोहण्याचा मोह तरुणांना आवरला नाही. नदीपात्रात पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने प्रवाहात तरुण वाहू लागले. मात्र नदीतील झुडुपाजवळ अडकून बसले. याचदरम्यान पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील नेरे बीट चौकीचे पोलीस गस्त घालत तेथे आले. त्यांनी तरुणांना पाण्यात अडकलेले पाहिले. यानंतर तात्काळ पोलिसांनी दोरीच्या सहाय्याने दोघांना सुखरुप बाहेर काढले. पोलिसांनी अतिउत्साह टाळण्याचे आणि सतर्कतेचे आवाहन पर्यटकांना केले आहे.