मुंबई : भर उन्हाळ्यात देखील ऊन-पावसाचा खेळ अनुभवयास मिळत आहे. दरवर्षी (Unseasonable Rain) अवकाळी ही ठरलेली असते पण यंदा अवकाळीचा मुक्काम हा वाढत आहे. त्यामुळे फळबागांसह हंगामी पिकांवरही परिणाम होऊ लागला आहे. गत आवठवड्यात उत्तर महाराष्ट्र आणि कोकण भागात मर्यादित असणारा पाऊस आता पश्चिम महाराष्ट्रासह (Marathwada) मराठवाड्यापर्यंत आगेकूच करीत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर गारपिट होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. एकीकडे ही अवस्था असताना मात्र, विदर्भात (Temperature Increase) तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या दोन दिवसांपासून अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद केली असताना यामध्ये अणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.
उत्तर भारतामध्ये यंदा उष्णतेची लाट निर्माण होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने महिन्याभरापूर्वीच वर्तवला होता. त्यानुसार राजस्थान, गुजरात, झारखंड आणि मध्यप्रदेशात महिन्याभरापासून उष्णतेच्या झळांमध्ये वाढ होत आहे. याचाच परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर झाला आहे. उत्तर भारतामधून उष्ण वारे हे महाराष्ट्राकडे वाहत आहे. तर दक्षिणेकडून दमट वारे वाहत आहे. हे दोन्ही वारे महाराष्ट्रात आल्यावरच धडकत आहे. त्यामुळेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि आता मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तावण्यात आली आहे. या भागात 13 व 14 एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. बुधवारी मराठवाड्यात दिवस उजाडल्यापासून ढगाळ वातावरण आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात गारपिटचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे.
केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या इतर भागामध्येही वातावरणात बदल झालेला आहे. उत्तर प्रदेश ते विदर्भ पार करुन मध्य प्रदेशचा काही भागाकडे द्रोणीय स्थिती आणि हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. याचाच परिणाम म्हणून राज्यातील वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे राज्यात कुठे तापमानात वाढ तर कुठे अवकाळी अशी अवस्था झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात जोरदार मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि गारपिटीसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यापूर्वीपासून कोकणात तर पाऊस होतच आहे पण पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये गारपिटीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
Hapus Mango : आंबा खवय्यांसाठी महत्वाची बातमी, वाढत्या उन्हाचा काय झाला परिणाम?