मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी फडणवीस (Fadanvis) नावाचा अर्थ सांगितला आहे. राज ठाकरे यांनी फडणवीस नावासोबतच चिटणीस, पारसणीस या दोन्ही नावाचे अर्थ देखील सांगितले आहे. हर हर महादेव या चित्रपटाच्या निमित्ताने राज ठाकरे यांची मुलाखत आयोजित केली होती. अभिनेते सुभोध भावे यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी मुलाखतीत काही नावांचा उल्लेख करत त्यांची नावे कशी पडली ? त्या नावांचा अर्थ काय ? याबद्दल राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलंय. राज ठाकरे म्हणाले, चिटणीस हे नाव जे चिठ्ठी लिहायचे त्यांचे नाव चिटणीस झाले आहेत. पारस नविस म्हणजे पर्शियन लिहिणारा त्याचे नंतर पारसनीस झाले. तसे फडणवीस या शब्दाचा अर्थही सांगितला. फड म्हणजे फळा, फळ्यावर लिहिणारा फडणवीस. असं राज ठाकरे म्हणाले.
खरंतर राज ठाकरे यांनी यापूर्वी देखील जाहीर भाषणात फडणवीस या नावाबद्दल या भाष्य केले होते.
आता तर फडणवीस या नावाचा अर्थ काय ? हे नाव कसे पडले ? हे सांगून आडनावं कशी पडलेली आहेत याबद्दलचा अभ्यास असल्याचे दाखवून दिले आहे.
राज ठाकरे यांनी खरंतर इतिहासाच्या संदर्भात चित्रपट काढत असल्याचे जाहीर करत इतिहासातील व्यक्तींची आडनावे कशी पडली याचेही संदर्भ दिले आहे.
राज ठाकरे यांनी फडणवीस नावाचा उच्चार करताच मुलाखतीसाठी असलेले प्रेक्षकांना हसू आले होते, याशिवाय त्याला मी काय करू ? असं राज ठाकरे म्हणाले होते.
राज ठाकरे यांनी यावेळी राजकारणावर भाष्य करत टोलेबाजी करत असे घाणेरडे राजकारण पाहिले नाही म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.