एवढ्या सभा स्वत:च्या पक्षासाठी घेतल्या असत्या तर… संजय राऊत यांचा राज ठाकरे यांना टोला काय?

| Updated on: May 12, 2024 | 1:31 PM

मोदींनी 10 वर्षात कधी पत्रकार परिषद घेतलेली बघितली का? राहुल गांधी, उद्धव ठाकरेंप्रमाणे मोदींनी पत्रकार परिषद घेऊन दाखवावी, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या आजच्या मुलाखतीने चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पोटात गडबड झाली आहे. ते साहजिकच आहे, असा चिमटाही संजय राऊत यांनी काढला.

एवढ्या सभा स्वत:च्या पक्षासाठी घेतल्या असत्या तर... संजय राऊत यांचा राज ठाकरे यांना टोला काय?
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

राज ठाकरे मजबुरी म्हणून भाजपसोबत गेले की घाबरून गेले हे 4 तारखेनंतर कळेलच. मात्र मोदी-शाह यांना महाराष्ट्रात येऊ देऊ नका असं म्हणणारे राज ठाकरे त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसतात. भाजपमध्ये अनेक गुलाम आहेत. यामध्ये आणखी एका गुलामाची भर पडली. एवढ्या सभा राज ठाकरेंनी स्वतःच्या पक्षासाठी घेतल्या असत्या तर आज पक्ष राहिला असता, असा खोचक टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. नाशिक दौऱ्यावर आले असता संजय राऊत बोलत होते.

नाशिकमध्ये फक्त भाषण होत नाहीत. तर लोकांशी संवाद होत आहे. निवडणुकीची यंत्रणा आहे. या यंत्रणेला गती द्यावी लागत आहे. नाशिकची जागा महत्त्वाची आहे. शिवसेना सातत्याने ही जागा जिंकत आहे. आमच्या आधीच्या खासदाराने प्रलोभनाला बळी पडून गद्दारी केली. बेईमानी विरुद्ध सचोटी अशी ही लढाई आहे. विजयाची परंपरा कायम राहणार नाही तर शिवसेनेच्या वाट्याला जे मताधिक्य आलं त्यापेक्षा विक्रमी मताधिक्याने शिवसेना विजयी होईल. महाविकास आघाडीला संपूर्ण चित्र अनुकूल आहे, असं संजय राऊत म्हणाले.

लोकांनी निवडणूक ताब्यात घेतली

काल प्रियंका गांधी नंदूरबारला होत्या. इंदिरा गांधींचं ज्या पद्धतीने स्वागत व्हायचं तसंच त्यांचं स्वागत झालं. महाविकास आघाडी धुळ्याची जागा जिंकणार आहे. यावेळी रावेरमध्ये चमत्कार होणार आहे. लोक आता उमेदवार बघत नाही. मोदी नको, मोदी हटाव, देश बचाव ही घोषणा गावागावात गेलीय. ग्रामीण भागात ही घोषणा झाली आहे. महायुतीच्या लोकांना गावात घुसू देत नाहीत. लोकांनी ही निवडणूक ताब्यात घेतली आहे, असं संडय राऊत यांनी स्पष्ट केलंय.

लोकांना पैसे नकोय

ताकद म्हणजे काय? पैसे वाटप. मुख्यमंत्र्यांकडे अमाप पैसा आहे. बेहिशोबी पैसा, गैरमार्गाने मिळवलेला पैसा आहे. तो पैसा वाटप करायला मुख्यमंत्री येत आहेत. बाकी काय करणार? पैशाच्या वाटपावर निवडणूक जिंकता येणार नाही. लोकांना पैसे नकोय. त्यांना फक्त मोदींची राजवट घालवायची आहे. पैसेबिसे काही नको आहेत, असं राऊत म्हणाले.