अयोध्या : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात उत्तर प्रदेशातील एका खासदाराचं नाव गाजतंय. कारण उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) अयोध्या दौऱ्याला (Ayodhya Visit) कडाडून विरोध केला, तसेच राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशातील नागरिकांची माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही, असा पवित्रा सध्या त्यांनी घेतला आहे. मागेच त्यांनी भव्य रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं, तसेच त्यानंतर सभा घेत राज ठाकरेंना थेट विरोध दर्शवला. आता पुन्हा त्यांनी राज ठाकरेंवर कडाकडून टीका केली आहे. तसेच राज ठाकरे मला कधी विमानतळावर भेटले नाहीत नाहीतर दोन हात झाले असते, असे म्हणत राज ठाकरेंवर हल्लाबोल चढवाल आहे. तसेच राज ठाकरे हे प्रभु रामाचे गुन्हेगार आहेत, असेही ते म्हणाले आहेत.
उत्तर भारतीय हे भगवान रामाचे वंशज आहेत. महाराष्ट्रात उत्तर भारतीयांचा अपमान हा रामाचा अपमान आहे. त्यामुळे राज ठाकरे भगवान श्रीराम यांचे अपराधी आहेत. असे ते म्हणाले आहेत. तर बृजभूषण सिंग यांच्या समर्थनात बॅनरही लगले आहेत. 5 जून आयोध्या चलो, राज ठाकरे वापस जावो, असा मजकूर या बॅनरवर लिहिला आहे. राज ठाकरेंशी माझी काही दुश्मनी नाही. तसेच माझं काही नुकासान करण्याची त्यांची हिंमत नाही, असेही ते म्हणाले आहेत. तसेच माझी इच्छा होती की ते एकदिवस विमानतळावर मला भेटावे मात्र कधी भेटले नाही, नाहीतर दोन हात झाले असते, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना पुन्हा एकदा थेट आव्हान दिलंय.
तसेच राज ठाकरेंना आयोध्यामध्ये पाय ठेवू देणार नाही. जर वरून आले तर हनुमानजी वरून उचलून घेतील. माझ्या गावामध्ये 300 लोक पीडित आहे जेव्हा मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उत्तर भारतीयांना मारहाण केली होती. एक मिश्रा फॅमिलीला ट्रेनमध्ये बदडून त्यांची हत्या केली, असा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच गरोदर महिलांना जबरदस्ती ट्रेनमध्ये बसून ठेवलं त्यांच्यावर उपचार होऊ दिले नाहीत. त्यामुळे ही त्यांची धार्मिक यात्रा नाही. त्यांची राजकीय यात्रा आहे. हिंदू-मुस्लीम सर्वजण अयोध्यामध्ये एकत्र आलेला आहे त्यांच्याविरोधात, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणावर मनसे मात्र अद्याप मौन बाळगून आहे. त्यामुळे आता मनसेच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.