वाढलेली ढेरी, सिक्स पॅक, दादा, आव्हाड यांच्यात जुंपली, राज ठाकरे म्हणाले…

| Updated on: Dec 06, 2023 | 11:20 PM

कधी सर्वांत फिट आमदार म्हणून अजित पवार भाजपच्या गिरीश महाजनांचं कौतुकही करतात. नंतर गमतीनं अजित पवारच गिरीश महाजनांना अंकल म्हणूनही चिडवतात. काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या एका कार्यक्रमात भाजपचे चंद्रकांत पाटील उशिराने पोहोचले. त्यावर अजित पवार नाव न घेता केलेली टीका चर्चेत राहिली.

वाढलेली ढेरी, सिक्स पॅक, दादा, आव्हाड यांच्यात जुंपली, राज ठाकरे म्हणाले...
DCM AJIT PAWAR NAD JITENDR AVHAD
Follow us on

मुंबई | 6 डिसेंबर 2023 : राजकारण असो की समाजकारण कुणाच्याही पाठीवर मारावं पण पोटावर मारू नये असं म्हणतात. पण, सध्या अजित पवार आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये पोटसूड रंगला आहे. अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाडांच्या वाढलेल्या पोटावरून टीका केली. त्यानंतर आव्हाडांनी सुद्धा एक फोटो ट्विट करून त्याला प्रतिउत्तर दिलं. वरिष्ठ एकदा पावसात भिजले तसा यांचाही जोडीदार पावसात भिजून त्याचे ते पांढरा शर्ट, ढेरी आणि बाहेर ते सगळं. काय चाललंय कशाकरता चाललंय अशी टीका अजितदादा यांनी केली. त्याला आव्हाड यांनी तुमची जर सिक्स पॅक बॉडी असती तर गोष्ट वेगळी असं म्हणत पलाटवर केलाय.

अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामधील टीका आता वाढलेल्या ढेरीवर येऊन पोहचलीय. राष्ट्रवादीत गट तट पडल्यानंतर दोन्ही बाजूनं फक्त राजकीय टीका सुरू होती. मात्र, आता एकमेकांची पोटं कशी सुटली आहेत यावरून टीका होतेय. नवी मुंबईतल्या नेरुळमध्ये शरद पवारांची सभा झाली. त्यावेळी जितेंद्र आव्हाड बाजूला उभे होते. त्याचं फोटोवरून अजित पवारांनी नाव न घेता आव्हाडांच्या वाढलेल्या पोटावर विधान केलं.

पुढं नवीन पिढीचे दहा-पंधरा वर्ष महत्वाचे आहेत. त्या संदर्भात आपल्याला पुढं जायचं आहे. पुढं जात असताना आता कोण तरी काही तरी अधनंमधनं बोलत असतो. तसल्यांना उत्तरही मला द्यायची नाही. वरिष्ठ एकदा पावसात भिजले तसा यांचाही जोडीदार पावसात भिजून त्याचे ते पांढरा शर्ट, ढेरी आली बाहेर ते सगळं ते काय चाललंय? कशाकरता चाललंय? अशी टीका अजित पवार यांनी केली.

जितेंद्र आव्हाड यांनी त्यावर ट्विट केलंय. दादा तुम्ही माझ्यावर वयक्तिक बोलला नसता तर मी आपल्या विरोधात एक शब्दही काढला नसता. माझ्यावर दरवेळेस वैयक्तित टीका कशासाठी? पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला. तेव्हा मला वाटलं की तुम्ही व्यायाम करून सिक्स पॅक केले असतील पण हा परवाचा फोटो तुमची ढेरी दाखवतोय, असा टोला त्यांनी ट्विटवरून लगावला.

मला जर त्यांनी फोन करून अरे जितेंद्र पोट वाढतंय जरा सांभाळ असे म्हणाले असते तर त्यांच्याबद्दल प्रेम, आदर वाढला असता. पण, माझं पोट हे व्यंग आहे असं दाखवण्याचा प्रकार हा द्वेषातनंच आला. माझ्या निष्ठेबद्दल तुम्हाला राग असेल तर तो राग सहन करण्याची हिंमत आणि ताकद परमेश्वराने मला दिली आहे. माननीय आर आर पाटलांवर जेव्हा टीका झाली की कुठेही जाऊन फुलतात. तेव्हा तो माणूस चोवीस तास रडला होता याची आठवणही आव्हाड यांनी करून दिलीय.

याचवेळी आव्हाड यांनी अजितदादा अडचणीत होतात तेव्हा पाठराखण करण्यासाठी हाच जितेंद्र आव्हाड पुढे आला होता असे म्हणत विविध दाखले दिलेत. सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा झाला तेव्हा किल्ला लढवणारा माणूस जितेंद्र आव्हाड, तुमच्या बंगल्यांविषयी ते बंगले कुठे उभारले गेलेत? काय उभारले गेलेत याच्यावरती चर्चा झाली? तेव्हा जितेंद्र आव्हाड, लवासा प्रकरणी तुम्ही दिलेल्या परवानगी चुकीच्या आहेत. त्या कशा खऱ्या आहेत हे पुराव्यानिशी सर्व विरोधी पक्षांसमोर सिद्ध करणारा जितेंद्र आव्हाड. मग मी कुठे चुकलो दादा? होय मी शरद पवारांबरोबर आहे, राहीन, मरीन पण मी तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात व्यक्तिगत तुमच्या कधी काही बोललेलो नाही, अशा शब्दात आव्हाड यांनी दादांचा समाचार घेतलाय.

कधी सर्वांत फिट आमदार म्हणून अजित पवार भाजपच्या गिरीश महाजनांचं कौतुकही करतात. नंतर गमतीनं अजित पवारच गिरीश महाजनांना अंकल म्हणूनही चिडवतात. काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या एका कार्यक्रमात भाजपचे चंद्रकांत पाटील उशिराने पोहोचले. त्यावर अजित पवार नाव न घेता केलेली टीका चर्चेत राहिली. अनेकजण हल्ली व्हायरल इन्फेक्शननं आजारी पडतात म्हणून दादांनी टीका केली. मात्र. योगायोगानं गेल्या वर्षभरात पित्त, डेंग्यू आणि व्हायरल इन्फेक्शन मुळे स्वतः अजित पवारही चर्चेत राहिले.