मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : भुजबळ आणि जरांगे यांनी आपआपल्या मुद्यावर भांडावं, वैक्तिगत टिका करु नये. भावना भडकविण्याचे काम करु नये महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. सामाजिक सलोखा राहणे महत्वाचे आहे असे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. एकेकाळी महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व केले, देशाला विचार दिले जगाला विचार दिले आता महाराष्ट्रात दैवतांना मानणाऱ्यांमध्ये वाद होत आहेत. नेत्यांमध्ये वाद, कार्यकर्त्यांमध्ये वाद आहेत. त्यामुळे महाराष्ट्र वेगळ्याच वळणार चालला असल्याचे बच्चू कडू यांना म्हटले आहे. आपल्याला हाती कारभार दिला तर एका महिन्यात सर्वकाही ठीक करु असेही त्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना म्हटले आहे.
ओबीसी आणि मराठा आरक्षणावरुन महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण कलुषित झाले आहे. यावरुन राज ठाकरे यांनी आर्थिक आरक्षणाची आपली भूमिका पुन्हा मांडणार असल्याचे म्हटले आहे. याबद्दल विचारले असता आमदार बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांना आर्थिक आरक्षणावरुन काहीही प्रतिसाद मिळणार नाही. हे त्यांनाही माहीती आहे. धर्म आणि जाती हे असे विषय आहेत की त्यास पेटविण्यासाठी काडी लावण्याची काही गरज नसते. आर्थिक निकषावर आरक्षण द्यायचं असेल तर केवळ शेतकरी आणि मजूरांना देण्यात यावे. इतरांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची काही गरज नसल्याचे बच्च कडू यांनी म्हटले आहे. आमच्या हातात सरकार द्या एका महिन्यात सर्व ठीक करु असेही ते म्हणाले.
बागेश्वर बाबांच्या दर्शनासाठी पुण्यात देवेंद्र फडणवीस आले यावरुन त्यांना विचारले असता बच्चू कडू यांनी त्यांना बागेश्वर बाबा महत्वाचे वाटले असतील. अनेकांचा चमत्काराला विरोध असतो. बागेश्वर बाबा तुकारामांबद्दल काही बोलेले असतील परंतू आता त्यांना तुकारामांच्या समाधीचे दर्शन घेतले त्यामुळे तो प्रश्न मिटला आहे. तुकाराम वैचारिक संत होते. बागेश्वर बाबा चमत्कार करणारे संत आहेत. ते साईबाबांना मानत नसतील. बागेश्वर बाबांना मानणारा मोठा वर्ग आहे. परंतू साईबाबांना मानणारी मोठा वर्ग आहे. हल्ली महाराष्ट्रात दैवतांना मानणाऱ्यामध्येही दोन गट पडले आहेत. महाराष्ट्र वेगळ्याच वळणार चालला असल्याचा खेद बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.
आपण जरांगे याचं मुख्यमंत्र्यांसोबत फोनवर बोलणं करुन दिले होते. मराठा आरक्षणावरुन जे गुन्हे दाखल केले ते मागे घेण्यासंदर्भात मागणी होती. महाजन यांनीही जरांगे यांच्याशी संपर्क केला होता. माझ्या त्या क्षणापुरताच जरांगे आणि मुख्यमंत्र्यांच्या चर्चेत सहभाग होता. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, जातीच्या नावाने आणि धर्माच्या नावाने वाद घडू नयेत, सामाजिक सलोखा जपावा, नेते भांडतात मात्र तळागाळातील कार्यकर्त्याचं मरण होतं. आमचं काय जिथे गरम असतं तिथे आम्ही पोळी शेकायलाच तयारच बसलोय, जेथे गरम असेल किटली ठेवायला तयार अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.