पुणे : राज ठाकरे यांनी (Pune) पुणे येथे पार पडलेल्या सभेत सर्वच विषयांना हात घालत (Shivsena) शिवसेनेच्या दुखऱ्या नसवर बोट ठेवण्याची एकही संधी सोडली नाही. सत्तेत सहभागी झाल्यापासून शिवसेनेचे सर्वकाही बदलले आहे. हिंदू – मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणासाठी एमआयएमला मोठं केलं गेलं आहे. (MIM) एमआयएम ची भूमिका ही सतत हिंदूच्या विरोधात राहिलेली असून यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटत असला तरी दुसरीकडे एमआयएम हा पाय पसरत असल्याचेही सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आले नाही. त्यामुळेच नाही म्हणता..म्हणता निजामाची औलाद असलेला औंरगाबादचा खासदार झाला आहे. यांना पोषक वातावरणही येथील पक्षाच्या भूमिकेमुळेच झाल्याचा घणाघात राज ठाकरे यांनी केला आहे. एमआयएम च्या बहाण्याने राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या दुखऱ्या नसंवर बोट कायम ठेवले हेच या सभेतून समोर आले आहे.
महाराष्ट्रात केवळ राजकारणासाठी एमआयएमला मोठे केले जात आहे. असे असले तरी एमआएमची भूमिका ही कायम हिंदूच्या विरोधात राहिलेली आहे. राजकारणातील स्वार्थापुढे ही बाब देखील सेनेच्या लक्षात आली नाही. म्हणूनच सेनेचा बालेकिल्ला असलेल्या संभाजीनगरमध्येही खासदार हा एमआय़एमचा झाला. निजामाचे वंशज हे पुन्हा महाराष्ट्रात येऊन वळवळ करु लागले आहेत. त्यासाठी पोषक वातावरण हे आता सत्तेत आहेत त्यांनीच करुन दिल्याचे सांगत राज ठाकरे यांनी शिवसेनेवर टिकेची झोड सोडून दिली. या दुटप्पी भूमिकेमुळेच संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा खासदार हा पडला. आग्र्याहून निघालेल्या औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवण्यापर्यंत यांचे धाडस वाढले आहे. हे सर्व होत असताना महाविकास आघाडी सरकार हे केवळ बघ्याची भूमिका घेत असून हिंदूत्वाबद्दल यांना काहीच सोयकसुतक नसल्याची टिका राज ठाकरे यांनी केली.
औरंगजेबाच्या कबरीवर एमआयएमच्या नेत्याने डोकं टेकवल्यानंतर का हाईना या घटनेला विरोध होणे गरजेचे होते. मात्र, सरकारने कोणती कारवाई न करता थंड भूमिका घेतली आहे. हे धक्कादायक असून म्हतारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. हळूहळू का होईना ह्या निजामाच्या औलादी ह्या महाराष्ट्रात पाय पसरवत असताना हे सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे प्रतापगडाच्या पायथ्याला 6 फूट असणारी कबर आता कित्येक हजार फूटावर वाढली आहे. त्याला या सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले