पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी छञपती शिवाजी महाराजांचा इतिहास तसेच रायगडावरील समाधीचा जिर्णोद्धारसंदर्भात केलेले दावे चुकीचे असल्याचं मत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केलं आहे. इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे(shrimant Kokate) यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. राज ठाकरे इतिहासाची (History)मोडतोड करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांचे समर्थन करत आहे. जेम्स लेनच्या पुस्तकाची पार्श्वभूमी बाबासाहेब पुरंदरेंनी तयार केली होती. जेम्स लेन च्या पुस्तकाचं त्यांनी कौतुक केलं होतं. शिवाजी राजेंची बदनामी करणे या कटात ठाकरेंचा देखील हात असल्याचा आरोप श्रीमंत कोकाटे यांनी केला आहे.
शिवाजी महाराजांची राजमुद्रा राज ठाकरे वापरतात. राजमुद्रा वापरतात परंतु ते तसे वागत नाहीत.म्हणून त्यावर आमचा आक्षेप आहे. राज ठाकरे यांनी पक्षाच्या झेंड्यावर राजमुद्रा वापरु नये. रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्यांनी बांधली असं त्यांनी औरंगाबाद मध्ये सांगितलं, ते खोटं आहे.
छ्त्रपती संभाजी महाराजांची समाधी छञपती संभाजी राजेंनी बांधली. महात्मा फुले 1869 ला रायगडावर गेले. त्यांनी समाधी शोधून काढली. टिळकांनी समाधीचा एकही दगड बांधल्याची नोंद नाही. राज ठाकरे यांनी इतिहासाचा खून केलाय. लोकमान्य टिळकांचे वंशज कुणाल टिळक यांनी विवेकी भूमिका घेतली. समाधीचं बांधकाम टिळकांनी केलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे राज ठाकरे तोंडावर आपटले.
राज ठाकरे टिळक, पुरंदरे आणि रामदासांचे समर्थन करतात हा त्यांचा जातीयवाद आहे. येत्या काळात महाराष्ट्रात जाती जातीत द्वेष निर्माण करून दंगली घडवणे हा राज ठाकरे यांचा हेतू आहे. म्हणून आमचा त्यांना विरोध आहे.