राज ठाकरे यांचे ‘ते’ भाषण व्हायरल, दरड कोसळण्याची व्यक्त केली होती भीती

| Updated on: Jul 21, 2023 | 10:06 PM

प्रशासनाने जागृत राहीलं पाहिजे. आपल्या लोकांनाही मोठ्या प्रमाणात जागृत ठेवलं पाहिजे, असं राज ठाकरे या क्लीपमध्ये म्हणत आहेत.

राज ठाकरे यांचे ते भाषण व्हायरल, दरड कोसळण्याची व्यक्त केली होती भीती
Follow us on

मुंबई : इर्शाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचे मृतदेह सापडलेत. ११९ जणांना वाचवण्यात यश आलं. ११ जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दरडी कोसळ्यासंदर्भात धोका व्यक्त केला होता. ती क्लीप आता व्हायरल होत आहे. ११ जूनच्या भाषणात राज ठाकरे यांनी दरडी कोसळू शकतात, असा इशारा दिला होता. यावेळच्या पावसात कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात दरडी कोसळू शकतात. त्यामुळे प्रशासनाने जागृत राहीलं पाहिजे. आपल्या लोकांनाही मोठ्या प्रमाणात जागृत ठेवलं पाहिजे, असं राज ठाकरे या क्लीपमध्ये म्हणत आहेत.

बेघरांचे पुनर्वसन होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळवाडीतील नागरिकांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. इर्शाळवाडीतल्या नागरिकांना सिडकोद्वारे कायमस्वरुपी घरं बांधून दिलं जाणार आहे. पुनर्वसन झाले पाहिजे म्हणून जागा बघीतली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

अमित ठाकरे यांची सरकारवर टीका

या दुर्घटनेवरून अमित ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर दुर्घटना टाळता आली असती, असं अमित ठाकरे म्हणाले. अमित ठाकरे यांची सध्या ट्रेनिंग सुरू आहे. त्यांना संधी दिली पाहिजे, असा टोला नीलेश राणे यांनी लगावला.

घरांच्या वर मातीचे ढिगारे

इर्शाळवाडीतल्या दुर्घनेत अनेकांचे जीव गेले. ज्यांचे जीव वाचले ते परत आपल्या घराच्या शोधात आहेत. घटना रात्री साडेदहा वाजता झाली. जाग आली तेव्हा सगळं गाडलं गेलं होतं. घरांच्या वर मातीचा ढिगारा लागला होता, असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.

ढिगाऱ्याखालील मृतदेह शोधण्यासाठी एनडीआरएफचे जवान काम करत आहेत. या शोधकार्यातही पाऊस अडथळा आणत आहे.