‘फक्त छगन भुजबळ नाहीत तर अनेकजण नाराज’, बड्या व्यक्तीचा मोठा दावा

| Updated on: Dec 19, 2024 | 10:20 PM

महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊन आता 15 दिवस झाली आहे. नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारही नुकताच झाला आहे. तसेच विधिमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशनही पार पडत आहे. असं असताना नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप अद्याप पार पडलेलं नाही. त्याबाबत बड्या नेत्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे.

फक्त छगन भुजबळ नाहीत तर अनेकजण नाराज, बड्या व्यक्तीचा मोठा दावा
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ
Follow us on

“राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत. पण नाराजांची यादी किती सांगू. एकावर एक नाराजी आहे. हे जनतेने दिलेले बहुमत आहे की दाखवलेले बहुमत आहे? अशी शंका निर्माण होते”, असे वक्तव्य माजी खासदार आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले आहे. ते सांगलीच्या तासगावमध्ये शिवार कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. राज्यात नवं सरकार स्थापन झालं असलं तरी नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाही, यावरुन त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

“निवडणुकीचा निकाल लागून महिना होऊन गेला. मुख्यमंत्री ठरायला वेळ लागला. खातेवाटप अजून झालेलं नाही. नागपूरचे अधिवेशन झाले. मात्र खातेवाटप झाले नाही. हे तिघेच प्रश्नाचे उत्तर देणार होते तर एवढ्या मंत्र्यांचा पसारा करायचं कारणच काय होते? म्हणजे सर्व आनंदी आनंदच आहे. ज्यांना काही मिळाले नाही ते आपापल्या मतदारसंघात गेले आहेत, आणि रुसलेले आहेत”, असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला.

“अशा पद्धतीने सगळा सावळा गोंधळ चाललेला आहे. खरंतर जनतेने यांना खरोखर जनमत दिले आहे काय? अन्य मार्गाने सत्येवर आलेत मला माहित नाही. जनतेने निवडून दिले असेल तर हा जनतेचा अपमान आहे. कारण तशा पद्धतीने यांचं कामकाज सुरू आहे”, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.

हे सुद्धा वाचा

‘बाबसाहेबांचं नाव घेतल्यावर यांना वाईट का वाटतंय?’

“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे देशाचे अभिमान आणि आत्मसन्मान आहेत. बाबासाहेबांच्या संविधानामुळे अनेक जण संसदेत गेले. असे असताना वक्तव्य करणे म्हणजे देशाच्या गृहमंत्र्यांना शोभत नाही आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे पंतप्रधान समर्थन करतात हे योग्य नाही. बाबसाहेबांचं नाव घेतल्यावर यांना वाईट का वाटतंय? मला ते कळत नाही. त्याच्या मनात जी वळवळ आहे ती ओठातून व्यक्त झाली”, असं राजू शेट्टी म्हणाले. तसेच “गुन्हेगारांवर कायद्याचा धाक राहिला नाही. कायदा-सुव्यवस्था आहे की पुस्तकातच आहे? हे कळेना झाले आहे”, अशी देखील टीका राजू शेट्टी यांनी केली.