कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी महाविकास (Raju Shetty) आघाडीवर टीका करत आहे. आता राजू शेट्टी महाविकास आघाडून (Mahavikas Aghadi) बाहेर पडण्यााची शक्यता आहे. सुरुवातीला भाजपवर (BJP) निशाणा साधत महाविकास आघाडीबरोबर जाणाऱ्या राजू शेट्टींचं महाविकास आघाडीशी फार काही पटलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हुंकार यात्रेची घोषणा करण्यात आलीय. यात शेतमजुरांसाठी कल्याणकारी मंडळ तयार करावं, अशी प्रमुख मागणी ठेवण्यात आलीय. सर्वच पिकांना हमीभाव मिळावा असे ठराव येत्या 1 मेच्या गाव सभेत करायचे आहेत, असेही ठरले आहे. हे ठराव घेऊन राष्ट्रपतींना भेटणार आहोत, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे. आतापर्यंत संसदेत खासदारांच्या मागणीवरून कायदे केले, आता शेतकऱ्यांना मागणीवरून कायदे करायला भाग पाडू, असा इशारा यावेळी राजू शेट्टी यांनी दिला आहे.
शेतीला दिवसा 10 तास वीज मिळावी असा देखील ठराव करायचा आहे. त्यासाठी 15 एप्रिल पासून बळीराजा हुंकार यात्रा काढणार असेही ते म्हणाले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातल्या ठरावाबाबत जागृती करणार आहोत, अशीही माहिती त्यांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थानाच्या निवडणुकांचा केंद्र आणि राज्य सरकारने पोर खेळ करून टाकला आहे. एकमेकावर कुरघोड्या करत आरक्षण संपवून टाकलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणं आहेत तशी दिली पाहिजेत, असेही ते म्हणाले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारला विनंती आहे, तुमचं दळभद्री राजकारण बंद करून आरक्षण पूर्ववत करा अन्यथा किंमत मोजावी लागेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
तसेच महाविकास आघाडीसोबत संबंध ठेवायचे की नाही याचा निर्णय आज घ्यायचा आहे. आज सकाळपासून अनेकांनी संतप्त मनोगत व्यक्त केली. चळवळ मजबूत करता यावी म्हणून निवडणुका लढवल्या. तेव्हाही शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार आहे याचा विचार नेहमी केला, असे राजू शेट्टी म्हणाले आहेत. एनडीएला पाठींबा देण्याचा निर्णय का घेतला तर घोटाळा झाल्याचे वातावरण तयार झाले होते, अशा वेळी सर्वसामान्य नागरिकांचे मत झाले होते की एक स्वछ सरकार पाहिजे, काळा पैसा भारतात आणणारे कुणीतरी पाहिजे म्हणून आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्तीने आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो होतो. त्यावेळी आम्ही मोदी यांना तुम्ही कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहात हे विचारलं होतं, त्यावेळी मोदी यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार असं बोलले होते. त्यावेळी स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करणार असं आश्वासन दिलं तर शेतकरी तुमच्याबरोबर येईल असं म्हणाले होते, असे स्पष्टीकरणही राजू शेट्टी यांनी दिले आहे.
तसेच भूमिअधिग्रहण कायद्याला एनडीएत असताना ही संसदेत विरोध केला. पण आज अधिकार आल्यावर महाविकास आघाडी सरकारने भयानक दुरुस्ती केली, असा आरोप त्यांनी केला आहे. काँग्रेसचं काय चाललंय कळत नाही. काँग्रेसचं धोरण बदललं आहे, इथले नेते वरिष्ठ नेत्यांचं ऐकत नाहीत. मी याबाबत सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ही पत्र लिहिलं होतं. महाविकास आघाडी मधील तीनीही पक्षांची राज्यातील भूमिका वेगळी आहे आणि दिल्लीतील भूमिका वेगळी आहे. महाविकास आघाडीचे हे आपलं सरकार आहे, पण दीड वर्ष राज्यात ऊसदर नियंत्रण समिती नव्हती, नंतर कारखानदारा समोर दबून राहील अशी समिती नेमली गेली, असा आरोप त्यांनी केला आहे.
Nitin Raut: ऊर्जा क्षेत्राच्या खासगीकरणाचे केंद्र सरकारचे प्रयत्न हाणून पाडू; नितीन राऊत यांचा इशारा
Sanjay Raut ED: संजय राऊतांची संपत्ती जप्त का झाली? 9 प्रश्न आणि त्याची 9 उत्तरं सोप्या शब्दांत