कोल्हापूरः राज्यसभेच्या (Rajyasabha) पार्श्वभूमीवर आता राज्यातील राजकारणासह कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरणही आता तापले आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकारवर (Mahavikas Aghadi) विरोधी पक्ष भाजप जोरदारपणे टीका करत आहे. तर राज्यसभेवर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय पवार (Rajysabha candidate Sanjay Pawar) नक्की विजयी होतील असा विश्वास खुद्द गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे. यावेळी विरोधी पक्ष आम्हाला आमदार सांभाळा म्हणत असेल तर त्यांनी त्यांचे आमदार सांभाळावेत असं सूचक वक्तव्यही सतेज पाटील यांनी या निवडणुकीविषयी केलं आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, एकाच विचाराचे सरकार असल्या कारणाने आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे गेल्या दोन ते अडीच वर्षापासून तीन पक्षाचे आमदार, लोकप्रतिनिधी एकत्रपणे काम करत आहेत. त्यामुळे विरोधकांनी आमचे आमदार सांभाळा असे जरे म्हटले असले तरी त्यांनी त्यांचेच आमदार सांभाळावेत असेही यावेळी सांगितले आहे.
गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी आज कोल्हापूरात सांगितले की, 7 जून रोजी महाविकास आघाडीच्या आमदारांची मुंबईत बैठक होणार
आहे. या बैठकीला अपक्ष आमदारही सोबत असणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीविषयी विश्वास व्यक्त करताना सांगितले की, अपक्ष आमदारांना महाविकास आघाडीचा विचार मान्य आहे. त्यामुळे अपक्ष आमदार सोबत असल्याचे त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
राज्यसभेविषयी भाजप विश्वास व्यक्त करत असले तरी महाविकास आघाडीनेही आपले ठाम विश्वासावर सांगितले आहे की, आमच्या सोबत कोण आहे हे 10 तारखेला स्पष्ट होणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षांना आम्हाला आमदार सांभाळा असा सल्ला देत असेल त्यांनी त्यांचेच आमदार सांभाळावे असा टोलाही भाजपला त्यांना लगावला आहे.