एका बापाचा असशील तर…अरे दाऊदही थकला, तू किस झाड की पत्ती?; रामदास कदम यांचा भाजपच्या मंत्र्यावर घणाघाती हल्ला

| Updated on: Aug 19, 2024 | 2:49 PM

रवींद्र चव्हाण आणि रामदास कदम या युतीतील दोन मातब्बर नेत्यांमध्ये जुंपली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडत आहेत. भाषा हमरीतुमरीवर गेली आहे. एकमेकांचा बाप काढण्यापर्यंत हा वाद येऊन पोहोचला आहे.

एका बापाचा असशील तर...अरे दाऊदही थकला, तू किस झाड की पत्ती?; रामदास कदम यांचा भाजपच्या मंत्र्यावर घणाघाती हल्ला
रवींद्र चव्हाण आणि रामदास कदम यांच्यात वाद
Image Credit source: social media
Follow us on

राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते रवींद्र चव्हाण आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यात चांगलीच जुंपली आहे. रामदास कदम यांनी कालच रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केल्यानंतर आज तर घणाघाती हल्लाच चढवला आहे. रवींद्र चव्हाण यांची औकात काय? मला आव्हान देण्यापेक्षा मुंबई-गोवा महामार्ग करून घे. तू कुचकामी आहेस. गेल्यावर्षी तुम्ही शब्द दिला होता. गणपती उत्सवात कोणतीही अडचण येणार नाही असं म्हटलं होतं. त्याचं काय झालं? मुद्द्यावर बोल. रस्त्यावरच्या गुंडासारखं बोलू नको. हिंमत असेल तर मुंबई-गोवा रस्त्यासाठी काय करणार हे बोल ना? दाऊदही थकला माझ्यासमोर. तू किस झाड की पत्ती आहेस? असा घणाघाती हल्लाच रामदास कदम यांनी केला आहे.

माजी मंत्री रामदास कदम यांनी मीडियाशी संवाद साधताना मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. मुंबई-गोवा महामार्गावर जे खड्डे पडले आहेत, त्याकडे मी त्यांचं लक्ष वेधलं आहे, असं सांगतानाच रविंद्र चव्हाण वेडा झाला आहे. मी दाऊदला घाबरत नाही, तर रवींद्र चव्हाण कोण आहेत? रवींद्र चव्हाण यांनी काहीही विकासकाम केले नाही. रवींद्र चव्हाण यांना युती तोडायची आहे. रवींद्र चव्हाण युतीच्या आमदारांना मदत करत नाही, असा आरोपच रामदास कदम यांनी केला आहे.

एका बापाचा असशील तर…

हे सुद्धा वाचा

रवींद्र चव्हाण यांच्यावर बोलण्यासाठी त्यांची तेवढी औकात नाहीये. रामदास कदमचं थोबाड फोडायला त्याला 100 जन्म घ्यावे लागतील, त्यांना माहीत नाही अजून. त्याला कल्पना नाही याची. हा कानफाडीत देण्याच्या गोष्टी करतो. याची औकात आहे काय? अशी माणसं भरपूर पाहिलीत. भौंकनेवाला कुत्ता कभी काटता नही याची मला जाणीव आहे. अशा भुंकणाऱ्या कुत्र्यावर लक्ष द्यायला मला वेळ नाही. त्यांनी कोणत्या रस्त्यावर कुठे आणि किती वाजता यायचं मला सांगावं. तिथे येतो. तू एका बापाचा असशील तर ये तिथे. दाखव. तुझं आव्हान स्वीकारायला तयार आहे, असा आव्हानच रामदास कदम यांनी दिलं.

राजीनामा घ्या

फक्त चमकोगिरी करण्यापेक्षा, शायनिंग मारण्यापेक्षा काम झालं पाहिजे. अनेक पूल झाले नाहीत, रस्ताच नाही. खड्डेमय रस्ता आहे. नुसता पाहणी दौरा कशासाठी? देवेंद्र फडणवीस यांनी चव्हाण यांचा राजीनामा घेतला पाहिजे. हा कुचकामी मंत्री आहे. हे मी युती असतानाही डायरेक्ट सांगतो. कोकणातील लोकांचे हाल पाहवत नाहीत. रामदास भाई तुम्ही काय करता असं लोक विचारत आहेत, असंही ते म्हणाले.

चव्हाण यांचा इशारा काय?

दरम्यान, रवींद्र चव्हाण यांनीही कदम यांच्या टीकेला उत्तर दिलं होतं. मलाही बोलायला येतं. बोलायला समोरासमोर या. कोणीही वाचवायला राहणार नाही. एवढं लक्षात ठेवा, कशा भाषेत बोलतात ते दाखवतो. रवींद्र चव्हाण आहे मी. रवींद्र चव्हाणांसारखं उत्तर देऊ शकतो. पण मी युती धर्म पाळतो. याचा अर्थ नाही की कोणीही काहीही बोलेले आणि मी ऐकून घेईल. होणार नाही असं. तोंड सांभाळून बोला. तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच रवींद्र चव्हाण यांनी दिला होता.

ते अडाणी आहेत. त्यांना प्रश्न समजत नाही. हा नॅशनल हायवे आहे. तो नितीन गडकरी यांच्या अखत्यारीत येतो. पण ते अडाण्यासारखं उत्तर देत आहेत. त्यांच्या बाजूला बसून टाळ्या वाजवणारे तसेच. 15 वर्ष मंत्री होते. 30 वर्ष शिवसेनेत नेता म्हणून काम करत होते. त्यांनी काय काम केलं? असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.