पुणे : पत्रकारितेच्या शिक्षण क्षेत्रात राज्यभरात नाव असलेल्या पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतराचा वाद चांगलाच रंगला आहे. डेक्कन परिसरात असणारं हे इन्स्टिट्यूट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. मात्र, या स्थलांतरावरुन रानडे इन्स्टिट्यूटचं महत्व कमी करण्याचा हा डाव असल्याचा आरोप इन्स्टिट्यूटच्या माजी विद्यार्थ्यांनी केलाय. रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतर करण्यामागे षडयंत्र असल्याचा आरोप इन्स्टिट्यूट बचाव कृती समितीनं केला आहे. (Students strongly oppose to taking Ranade Institute in University campus)
रानडे इन्स्टिट्यूट हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतलाय. त्याला आता मोठा विरोध होत आहे. रानडे इन्स्टिट्यूटचे स्थलांतर करून त्याच्या जागेवर काही लोकांचा डोळा असल्याचा आरोप केला जातोय. ही जागा शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. या जागेची किंमत साधारण 400 कोटी असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे रानडे इन्स्टिट्यूटचे स्थलांतर केलं तर तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी कृती समितीने दिलाय. दरम्यान 15 दिवसात यासंदर्भात अभ्यास करून निर्णय घेऊ असं आश्वासन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिले.
इंट्रोडक्शन टू ड्रोन टेक्नॉलॉजी (कालावधी – 2 आठवडे )
अड्वान्स कोर्स ऑन ड्रोन टेक्नॉलॉजी (कालावधी 12 आठवडे )
ड्रोन पायलट ट्रेनिंग कोर्स (एक ते दोन आठवडे)
बॅचलर ऑफ ऑटोनॉमस व्हेईकल (कालावधी तीन वर्षे)
मास्टर ऑफ ऑटोनॉमस व्हेईकल (कालावधी दोन वर्षे)
प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती कुठे मिळणार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रमांबाबत वेबसाईटवर प्रवेश परीक्षेसंदर्भात अधिक माहिती उलब्ध होईल. इच्छूक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वेबसाईटला भेट देऊन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती मिळवावी.
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 9 August 2021https://t.co/yTL1dhk8gM | #4Minutes24Headlines | #DevendraFadnavis | #ChhaganBhujbal | #Maharashtra | #mumbai |
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 9, 2021
इतर बातम्या :
Students strongly oppose to taking Ranade Institute in University campus