सांगलीः राज ठाकरेंना (Raj Thackeray) फुले, शाहू, आंबेडकरांची अॅलर्जी का आहे ? असा सवाल अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा इस्लामपूरमध्ये पोहचली असताना त्यांनी राज ठाकरे यांना केला आहे. त्यांच्यावर हल्लाबोल करत त्यांचा उल्लेख खाज ठाकरे म्हणूनही केला आहे. या यात्रेचा पाचवा टप्पा सांगलीतील इस्लामपूरमध्ये आला असता त्यांनी राज ठाकरे, चंद्रकांत पाटील आणि भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढविला. ही यात्रा येथून पुढे कोल्हापूरमध्ये जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत त्यांनी बोलताना सांगितले की, कोल्हापूर सिटी काशी आहे, आणि हे चंद्रकांत पाटील यांना चांगलेच माहीत असेल.
कारण पोटनिवडणुकीच्या निकालानंतर हिमालयात जाणार होते त्याचे काय झाले माहीत नाही असा सवालही त्यांनी यावेळी केला. सध्या महाराष्ट्रात जोरजोरात बोलण्याची स्पर्धा लागली आहे. भाजपची एक टीम त्यासाठी तयार झाली आहे ती फक्त शरद पवार यांच्यावर बोलण्यासाठी.
गोवा विधानसभा भाजप जिकल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये रॉड शो केला. त्यावेळी त्यांनी सांगितले की, नक्कल करत म्हणाले या महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल होणार आहे. मात्र कोल्हापूर पोटनिवडणुकीनंतर गप्प झाले. कारण शरम तो शरम आती हे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला. यावेळी त्यांनी सकाळी टीव्ही सांगितले की, टीव्ही लावली की, याचा घोटाळा काढला, त्याचा काढला असे म्हणत त्यांनी अनेकांची नक्कल केली.
या संवाद यात्रेत त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावरही टीका करत ते म्हणाले की, सदावर्ते यांच्यावर पीएचडी केली पाहिजे. ज्या सोसायटीमध्ये राहतो, त्या सर्वांनाच ते त्रास देतात, आणि नेतृत्व एसटी कर्मचाऱ्यांचे करतात. या सदावर्ते यांचे धागेदोरे आता नागपूरपर्यंत असल्याचे सांगत त्यांनीच एसटी कर्मचाऱ्यांचा घोटाळा केला आहे असेही त्यांनी सांगितले.”
यावेळी अमोल मिटकरी यांनी मोहित कंबोज हेच यांचे मोठे भोंगे आहेत, अशी टीका करत एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर राज ठाकरे चेहरा नागाच्या फणा असावा तसा दिसतो अशी टीका त्यांनी केली होती, त्यालाही प्रत्युत्तर देत आम्हीपण आता यांचे व्हिडीओ लावणार आणि म्हणणार आहे. शरद पवार यांचे कौतुक माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केले होते असे सांगत त्यांनी त्याची आठवण करुन दिली. राष्ट्रवादी जातीयवादाची टीका केली जाते मात्र याच पक्षात अनेक जातीतील लोक या पक्ष्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या राज ठाकरे यांनी पवार साहेब शिवाजी महाराजांचे नाव का घेत नाहीत अशी टीका केली होती, त्या टीकेला प्रत्युत्तर देत शरद पवार यांच्या हृदयात शिवाजी महाराज आहेत असेही त्यांनी सांगितले. बाबासाहेबानी संविधानात लिहिला आहे. त्यात समान नागरी कायदा आहे. तुम्ही फुले, शाहू महाराजांचे नाव घेता मात्र फोटो कुणाचा लावता असा सवाल करत बाबासाहेब पुरंदरेंचा खरा चेहरा जितेंद्र आव्हाडांनी समोर आणला आहे अशी टीकाही त्यांनी केली.
या सभेत त्यांनी पुरंदरने काय लिहिले आहे मी सांगतो, असे म्हणत त्यांनी पंत दादोजी कोंडेदेव जिजाबाईंच्या सहवासात होते. यांना लाज वाटायला पाहिजे, पुरंदरने जे लिहिले ते यांना मान्य आहे का.? तरुण मुलांनी अशा लोकांच्या नादाला लागला तर पिढ्या बरबाद होतील असा जोरदार हल्लाबोल त्यांनी चढवला. यावेळी त्यांनी भोंगे लावण्याच्या राजकारणावरुन मुद्दा उपस्थित करत त्यांनी सांगितले की, राज ठाकरे म्हणतात भोंगे लावला तर हनुमान चालीसा वाजवू, अशा प्रकारचे राजकारण करणाऱ्यांपासून सावधान राहा. त्यामुळे भाजपवाल्यानी भक्ती आम्हाला शिकवू नये, ती आम्हालाही माहिती आहे असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली.
संबंधित बातम्या
Ganesh Naik : गणेश नाईक यांनी शारिरीक, मानसिक छळ केला; दीपा चौहान यांनी सांगितली आपबीती
Heavy Rain : ऐन उन्हाळ्यात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट?
Solapur : सोलापुरातील जवानाला उत्तराखंडमध्ये वीरमरण, लष्कराचे वाहन दरीत कोसळले